Hyundai ची Santro, Grand i10, Aura कारवर ग्राहकांना मिळणार 1 लाखांपर्यंत सूट
ह्युंडाई (Photo Credits- Twitter)

2020 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कंपन्या स्टॉक संपवण्यासाठी डिसेंबर मध्ये काही पॉप्युलर कारवर बंपर सूट देत आहे. यामध्ये Maruti Suzuki, Mahindra सह अन्य कंपन्यांसह Hyundai India सुद्धा Santro, Grand i10, Grand i10 Nios, Aura आणि Elantra सारख्या हॅचबॅक आणि सेडान कावर एक लाख रुपयांपर्यंत सूट देणार आहे. अशातच तुम्ही ह्युंदाई या दमदार कारवर कोणहीती कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास ही तुमच्याकडे उत्तम संधी आहे.(Datsun च्या 'या' फॅमिली कारवर दिला जातोय 51 हजारांचा बंपर डिस्काउंट, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

Hyundai Motor Company सर्वाधिक सूट त्यांची प्रीमियम सेडान Hyundai Elantra वर देणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास त्यावर एक लाखांपर्यंत सूट दिली जाणार आहे. ज्यामध्ये 70 हजार रुपयांपर्यंत कॅश बेनिफिट्स आणि 30 हजारांचा एक्सचेंज बोनस दिला जाणार आहे. ह्युंदाई एलेंट्राच्या मॅन्युअल ट्रान्समिशन वर एक लाख आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर 60 हजार रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. भारतात Hyundai Elantra ची किंमत 17.60 लाख रुपये ते 20.65 लाख रुपयांपर्यंत आहे.

Hyundai Santro च्या कारवर 40 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाते. यामध्ये 30 हजारांचा कॅश डिस्काउंटसह 15 हजारांचा एक्सचेंज ऑफर आणि 5 हजारांचा कॉर्पोरेट आणि अन्य वेरियंटवर 50 हजारांची सूट दिली जाणार आहे. भारतात Hyundai Santro वर 4.63 लाख रुपये ते 6.31 लाखांपर्यंतच्या किंमती मध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

Hyundai Grand i10 या पॉप्युलर हॅचबॅकवर कंपनीकडून  Year End Sale दरम्यान  60 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. ज्यामध्ये  40 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंटसोबत 15 हजारांचा एक्सचेंज ऑफर आणि  5 हजरांचा कॉर्पोरेट बोनस मिळणार आहे. ह्युंदाई ग्रँन्ड आय10 ची भारतात किंमत 5.91 लाख रुपयांपर्यंत ते 5.99 लाखांपर्यंत आहे. (Tata Motors च्या वाहन खरेदीवर 5 लाखांचे बक्षिस जिंकण्याची संधी, कंपनीने सुरु केली बंपर ऑफर)

तसेच Hyundai Aura वर 40 हजार रुपयांपासून ते 70 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. ज्यामध्ये 20 हजार ते 50 हजारापर्यंत कॅश डिस्काउंटसह 15 हजारांचा एक्सेचेंज ऑफर आणि 5 हजारांचा कॉर्पोरेट बोनस मिळणार आहे. भारतात ही कार गेल्या वर्षात लॉन्च केली होती. मात्र सध्या याची किममत 5.58 लाख रुपये ते 9.28 लाख रुपयांपर्यंत आहे.