नवी MPV Suzuki Solio Bandit लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Suzuki Solio Bandit (Photo Credits-Twitter)

जपानची कार निर्माता कंपनी सुजुकी यांनी त्यांच्या MPV गाड्यांमधील नवी MPV Suzuki Solio Bandit लॉन्च केली आहे. या एमपीवी कारचे डिझाइन बॉक्स सारखे आहे. त्यामुळे ही अत्यंत वेगळी दिसून येते. जपान मध्ये ही कार 2,006,400yen म्हणजेच 14.2 लाख रुपयांच्या सुरुवाती किंमती मध्ये लॉन्च केली आहे. याच्या टॉप वेरियंटची किंमत 2,131,800yen म्हणजेच 15.09 लाख रुपये आहे.(Nissan Magnite च्या भारतातील लॉन्चिंग बद्दल खुलासा, 5.50 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता- रिपोर्ट)

सुजुकी कंपनीची ही एमपीवी कार डिझाइन आणि स्टाइलमध्ये अपीलिंग आहे. ज्यामुळे तुमचे लक्ष त्याकडे आकर्षित होते. यामद्ये मोठ्या क्रोम बॉर्डरसह फ्रंट ग्रिल आणि स्लीक एलईडी हेडलॅम्प्ससह डीआरएल पाहिल्यास आकर्षित दिसतात. त्याचसोबत राउंड फॉग लॅप्म्स, ट्रेन्डी अलॉय व्हिल्स सुद्धा या एमपीवीची शोभा वाढवतात.

कंपनीने Suzuki Solio Bandit ही मोनोटोन आणि डुअल टोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केली आहे. याचे कार इंटिरियरसुद्धा डुअल टोन आहे. कंपनीने याच्या फ्रंटला पॅसेंजर सीट आणि रियर पॅसेंजर सीटच्या कंम्फर्टमध्ये विशेष लक्ष दिले आहे. या कारच्या फिचर्सबद्दल सांगायचे झाल्यास ही कार पूर्णपणे ऑटोमॅटिक एसी असून यामध्ये 9 इंचाचा इन्फोटेन्मेंट दिला आहे. सुजुकी सोलिओ बँडिट मध्ये किलेस एन्ट्री, पॉवर स्टिअरिंग, स्लाइडिंग डोअर, ड्रायव्हर पॅसेंजर सीट हिटरसह 6 स्पीकर दिले आहेत. यामधील पुढील दोन सीट अॅडजेस्ट ही करता येणार आहेत,

Suzuki Solio Bandit च्या इंजिन क्षमतेसाठी यामध्ये 1.2 लीटर गॅसोलीन इंजिन दिले आहे. जे 6000rpm वर 91 पीएसची मॅक्सिमम पॉवर आणि 6000rpm वर 118 एनएम टॉर्क जनरेट करणार आहे. तर याचे DC synchronous motor 3.2 पीएसची पॉवर आणि 50 एनएम टॉर्क जनरेट करणार आहे. सुजुकीने या कारमध्ये 3 रायडिंग मोड दिले आहेत. त्यात Urban, Suburban आणि Highway यांचा समावेश आहे. याच्या दोन्ही वेरियंटचे मायलेज 15.3 kmpl ते 21.1 km प्रति तास आहे.(Tata Harrier Camo Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमत)

Suzuki Solio Bandit च्या सेफ्टी फिचर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये डुअल एअरबॅग्ससह एसआरआस एअरबॅग्स ही दिले आहेत. त्याचसोबत लेड डेविएशन वॉर्निंग सिस्टिम, अॅडेप्टिव्ह क्रुज कंट्रोल, रियर पार्किंग सेंसर्स, हेड अप डिस्प्ले, ESP,EBD सह ABS, फ्रंट डिस्क ब्रेक, हिल होल्ड कंट्रोल, 360 डिग्री व्यु कॅमेरा, सिक्युरिटी अलार्म सिस्टिम, इंजिन मोबिलाइजर आणि इमरजेंसी पंक्चर रिपेयर किटसह अन्य फिचर्स ग्राहकांना मिळणार आहेत.