Tata ने लॉन्च केला नव्या सफारीचा टीझर, लवकरच बाजारात उतरवली जाणार ही आयकॉनिक एसयुवी
Tata Motors | (Photo Credits: Tatamotors.com)

देशातील दिग्गज वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) यांनी आपली पॉपुलर आयकॉनिक ब्रँन्ड Safari पुन्हा एकदा घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे. आता कंपनीने याचा टीझर सुद्धा लॉन्च केला आहे. या टीझरमध्ये कारच्या पुढील बाजूचा भाग झळकवला गेला आहे. तर कारच्या फ्रंट ग्रिल क्रोम फिनिशसह टाटाच्या नव्या ट्राइंगल डिझाइनसह दिसून येणार आहे. या व्यतिरिक्त एका सााइडच्या एलईडी DRLs सह मास्क्युलर बोनेट असणारे अग्रेसिव्ह लूक ही पहायला मिळणार आहे.

कंपनीने याआधी ही कार हॅरियर 7 सीटर वर्जनच्या रुपातील ग्रॅविटास नावाने लॉन्च करण्यात येणार होती. परंतु टाटा ने नंतर आपली पॉप्युलर एसयुवी सफारी पुन्हा एकदा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जाहीर केलेल्या टीझरमध्ये अद्याप हे स्पष्ट झाले आहे की, 7 सीटर एसयुवी या महिन्याचा जानेवारीत भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा ही प्रजासत्ताक दिनापूर्वी बाजारात उतरवू शकते.(Maruti Suzuki Swift चे लिमिटेड ॲडिशन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

रिपोर्ट्सनुसार, नवी सफारी ओमेगार्क प्रमाणित क्षमतेसह तयार केली आहे. कंपनीने हा प्लॅटफॉर्म टाटा हॅरियरसाठी सुद्धा वापरला आहे. रिपोर्ट्सनुसार, यामध्ये ऑप्शनल 4WD ची सुविधा सुद्धा दिली जाऊ शकते. याच्या इंटीरियर मध्ये बोलायचे झाल्यास कंपनी यामध्ये लहान मोठे बदल केले जाऊ शकतात. हरमनचे साउंड सिस्टिम, थ्री स्पोक स्टिअरिंग व्हिल, अॅन्ड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले सपोर्ट करणारा 8.8 इंचाचा फ्लोटिंग इंन्फोटेन्मेंट सिस्टिम, 7 इंचाचा इंस्ट्रुमेंटल पॅनल सारखी सुविधा दिली जाणार आहे. तर पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास नव्या सफारी 2021 मध्ये हॅरियरचे इंजिन दिले जाऊ शकते. 2.0 लीटर, 4 सिलिंडर डिझेल इंजिन असणार आहे. ज्यामध्ये 168bhp ची पॉवर आणि 350Nm चे टॉर्क जनरेट करण्याची क्षमता असणार आहे.