भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुजुकी (Maruti Suzuki Swift) यांनी त्यांच्या स्विफ्ट चे लिमिटेड अॅडिशन लॉन्च केले आहे. तर स्विफ्ट ही त्यांच्या सेगमेंट मधील सर्वात पॉप्युलर हॅचबॅक पैकी एक आहे. या कारचे रेग्युलर मॉडेल ग्राहकांना आकर्षित करते. तर आता याचे लिमिटेड अॅडिशन ही सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कंपनीने याच्या डिझाइनसह कॅबिनमध्ये ही काही अपडेट्स केले आहे. त्यामुळे ती पाहिल्यास आधिपेक्षा अधिक स्टायलिश दिसणार आहे.(नवं वर्षात Tata कंपनी लॉन्च करणार दोन धमाकेदार कार, जाणून घ्या अधिक)
मारुती सुजुकी कंपनीने स्विफ्टचे लिमिटेड अॅडिशन फेस्टिव्ह सीजन दरम्यान ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लॉन्च केले आहे. तर कंपनीच्या कारच्या किंमती बद्दल बोलायचे झाल्यास त्यासाठी ग्राहकांना अधिक 24 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तर स्विफ्टची एक्स शो रुम किंमत 5.19 लाख रुपयांपासून सुरु आहे. याच्या LXI ट्रिम लिमिटेड अॅडिशनची किंमत 5.43 लाख रुपये असून टॉप मॉडेल ZXI प्लस AMT लिमिटेड अॅडिशनची किंमत 8.26 लाख रुपये आहे.
मारुती सुजुकी स्विफ्ट 2005 मध्ये लॉन्च होण्यासह वेळोवेळी ग्राहकांना अपडेट देत आहे. मात्र लिमिटेड अॅडिशनवाली स्विफ्ट याच्या रेग्युलर मॉडेलच्या तुलनेत अत्यंत वेगळी आहे. या खास स्विफ्टमध्ये ब्लॅक थीमचा वापर केला आहे. नव्या मॉडेलमध्ये एरोडायनमिक स्पॉइलर आणि बॉडी साइड मोल्डिंग व्यतिरिक्त ग्रिल, टेल लॅम्प आणि फॉग लॅम्प दिला जाणार आहे.(Year Ender 2020: यंदाच्या वर्षात भारतात लॉन्च झाल्या 'या' दमदार SUV, जाणून घ्या अधिक)
स्विफ्ट कंपनीच्या लिमिटेड अॅडिशन 2020 मध्ये कंपनीने कोणताही मॅकानिकल बदल केलेला नाही. यामध्ये रेग्युलर मॉडेल असणारे बीएस-6 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. जो 8पीएस ची पॉवर आणि 11Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT गिअरबॉक्स ऑप्शनसह येणार आहे.