टाटा मोटर्स (Tata Motors) भारतीय बाजारात त्यांच्या 2 नव्या कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून या नव्या कार नवं वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात लॉन्च करणार आहे. कंपनी 13 जानेवारीला बहुप्रतिक्षित टाटा अल्ट्रॉज लॉन्च करणार आहे. टर्बोचार्ज्ड इंजिन असणारी Tata Altroz ची भारतात गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा केली जात होती. टाटा अल्ट्रॉज व्यतिरिक्त टाटा ग्रेविटस सुद्धा भारतीय बाजारात एन्ट्री करणार आहे.(Tata Harrier, Renault Duster सह 'या' धमाकेदार कारवर बंपर सूट, जाणुन घ्या अधिक)
टाटा अल्ट्रोज आणि ग्रेविटस या दोन्ही मॉडेल्स व्यतिरिक्त कंपनी Tata HBX कॉन्सेप्ट मिनी एसयुवी सुद्धा घेऊन येणार आहे. टाटा हॅरियरचे पेट्रोल वर्जन ही कंपनी या वर्षात बाजारात उतवरणार आहे. टाटा अल्ट्रॉज आणि टाटा ग्रेविटससाठी लोकांना अधिक वेळ वाट पहावी लागणार नाही आहे. या दोन्ही कार जानेवारीत लॉन्चिंग केल्या जाणार आहेत.
सध्या अल्ट्रॉज 1.2 लीटर सिलेंडर, 3 सिलेंडर नॅच्युरली ऐस्परेटेड पेट्रोल आणि 1.5 लीटर, 4 सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन ऑप्शनसह येणार आहे. पेट्रोल इंजिन 85bhp ची पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करणार आहे. तर डिझेल इंजिन 89bhp ची पॉवर आणि 200Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. दोन्ही इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स येणार आहे.(Car Care in Winter: थंडीच्या दिवसात गाडी उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी 'या' टिप्स जरुर लक्षात ठेवा)
टाटा ग्रेविटसच्या कारमध्ये 8.8 इंचाचा टचस्क्रिन इंन्फोटेन्मेंट सिस्टिम दिला गेला आहे. जो अॅन्ड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट करणारा आहे. या व्यतिरिक्त यामध्ये ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, ड्राइव्ह मोड, क्रूज कंट्रोल, कि लेस एन्ट्री आणि पुश बटन स्टार्ट सारखे फिचर्स मिळणार आहेत. कंपनी कारमध्ये सनरुफ ची सुविधा ही देणार आहे. टाटा या नव्या एसयुव्ही मध्ये न्यूट्रल, रिव्हर्स, मॅन्युअल, ड्राइव्ह आणि पार्क सारखे 5 ड्रायव्हिंड मोड देणार आहे.