Tata Harrier, Renault Duster सह 'या' धमाकेदार कारवर बंपर सूट, जाणुन घ्या अधिक
Tata Nexon | (Images for symbolic purposes only । Photo Credits: tatamotors.com)

2020 हे वर्ष संपण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. याच दरम्यान कार निर्मात्या कंपन्यांकडून त्यांच्या पॉप्युलर कारवर ऑफर्स देऊ लागले आहेत. यामध्ये एसयुव्ही, सेडान, सब-कॉम्पॅक्ट एसयुवी सेगमेंट सारख्या धमाकेदार कारवर कंपन्या सूट देणार आहे. यामध्ये Jeep compass, Renault Duster, Honda Civic, Tata Harrier, Mahindra Alturas G4, Hyundai Elantra आणि Toyota Yaris यांचा समावेश आहे.(Tata Motors च्या वाहन खरेदीवर 5 लाखांचे बक्षिस जिंकण्याची संधी, कंपनीने सुरु केली बंपर ऑफर)

टाटा, रेनो, महिंद्रा, जीप, होंडा, टोयोटा आणि ह्युंदाई कारवर डिसेंबर 2020 मध्ये लाखो रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे. तर येथे कारच्या डिस्काउंटस अधिक माहिती जाणून घ्या.(Datsun च्या 'या' फॅमिली कारवर दिला जातोय 51 हजारांचा बंपर डिस्काउंट, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

Tata Harrier वर 70 हजारांपर्यंत सूट

टाटा मोटर्स यांची अत्यंत पॉप्युलर एसयुवी Tata Harrier च्या खरेदीवर तुम्हाला 70 हजार रुपयांपर्यंत सूटचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान टाटा हॅरियरच्या Camo आणि Dark Editions वर सूट दिली जाणार नाही आहे. टाटा हॅरियरची किंमत 13.84 लाख रुपये ते 20.30 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे जर तुम्ही या महिन्यात कार खरेदीचा विचार करत असल्यास त्यावर 25 हजारांपर्यंत कॅश डिस्काउंटसह 40 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 50 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाणार आहे.

Renault Duster वर 80 हजार रुपयांपर्यंत सूट

या महिन्यात जर तुम्ही Renault Duster खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यावर 80 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. ही सूट रेनो डस्टरच्या RXS Turbo वेरियंटच्या मॅन्युअल आणि CVT ऑप्शन पर्यंतच आहे.(Renault Kwid RXL Easy-R भारतातील सर्वाधिक स्वस्त ऑटोमॅटिक कार, किंमत 4.54 लाख रुपये)

Honda Civic या कारवर 2.5 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. तर Honda Civic च्या पेट्रोल वेरियंटवर 1 लाख रुपयांचाा कॅश डिस्काउंटची घोषणा करण्यात आली आहे. डिझेल वेरियंटवर 2.5 लाखांचा कॅश डिस्काउंट दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. होंडा सिविकच्या पेट्रोल वेरियंटची किंमत 17.93 लाख रुपये ते 21.24 लाख रुपये आहे. तर डिझेल वेरियंटची किंमत 20.74 लाख रुपये ते 22.34 लाख रुपये आहे.

तर डिसेंबर महिन्यात ग्राहकांना कार खरेदीवर दमदार सूटचा लाभ घेता येणार आहे. त्याचसोबत ग्राहकांना कॅश डिस्काउंट ही विविध कारवर मिळवता येणार आहे.