Maruti Suzuki S-Presso Mini SUV | (Photo Credits: Maruti Suzuki India)

यंदाच्या वर्षात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने सर्वांमध्ये निराशा दिसून आली तरीही या महासंकटाची चर्चा मात्र सर्वाधिक झाली. याच पार्श्वभुमीवर ऑटोमोबाईल मार्केटसाठी सुद्धा हे वर्ष अधिक मुश्किलीचे ठरले. मात्र वाहन निर्मात्या कंपन्यांनी काही शानदार गाड्या सुद्धा लॉन्च केल्या आहेत. भारतात SUV कारला  गेल्या काही काळापासून नागरिकांकडून  पसंदी मिळत आहे. (Maruti, Hyundai आणि Mahindra च्या गाड्या 1 जानेवारी पासून महागणार, जाणून घ्या कारण)

तर भारतात विविध वाहन निर्मात्या कंपन्यांनी त्यांच्या दमदार गाड्या कोरोनाच्या काळात लॉन्च केल्या. मात्र त्यावर सणासुदीच्या काळासह आता इअर इंडिगच्या वेळी ही सूट दिली जात आहे. तर जाणून घ्या भारतात यंदाच्या वर्षात 'या' काही दमदार एसयुवी कार लॉन्च झाल्या आहेत.

- न्यू जनरेशन ह्युंदाई क्रेटा

ही कार कंपनीने मार्च महिन्यात लॉन्च केली होती. भारतात या कारला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद ही मिळाला.  सेगमेंटमध्ये या कारची सध्या 42 टक्के हिस्सेदारी आहे.

- न्यू जनरेशन महिंद्रा थार

ही महिंद्राची सर्वाधिक पॉप्युलर ऑफरोडर आहे. कंपनीने ऑक्टोंबर महिन्यात ही कार न्यू जनरेशन मॉडेल लॉन्च केली होती.  लॉन्चिंग नंतर या कारला उत्तम प्रतिसाद  मिळणार आहे. कंपनीने या कारची डिलव्हरी ही सुरु केली आहे.

-किआ सोनेट

कंपनीने ही कार ह्युंदाई वैन्यु आणि मारुती सुजुकी विटारा ब्रेजा यांना टक्कर देण्यासाठी लॉन्च केली होती. कारला भारतात उत्तम प्रतिसाद मिळाला. सॉनेट ही आपल्या सेगमेंट मधील शानदार कार ठरली आहे.

-एमजी ग्लॉस्टर

MG ही प्रीमियम 7 सीटर SUV आहे. ही कार कंपनीने सुपर, शार्प, स्मार्ट आणि सैवी 4 वेरियंट्स मध्ये लॉन्च केली आहे. ही एक कनेक्टेड कार असून जी कंपनीची iSmart कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह येणार आहे.(खुशखबर! Ducati 2021 Monster बाइक 2021 मध्ये होणार भारतात लाँच, काय असतील याची खास वैशिष्ट्ये आणि किंमत?)

-निसान मॅग्नाइट

निसान मॅग्नाइट डिसेंबर 2020 मध्ये लॉन्च केली होती. आपल्या कॅटेगरि मधील ही सर्वात अफोर्डेबल एसयुवी कार आहे. या कारची सुरुवाती किंमत 4.99 लाख रुपये ते 9.35 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

तर वर्षाअखेरीस जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तर तुमच्याकडे उत्तम संधी आहे. कारण काही कार निर्मात्या कंपन्यांनी नव्या वर्षापासून त्यांच्या कारच्या किंमतीत वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे.