खुशखबर! Ducati 2021 Monster बाइक 2021 मध्ये होणार भारतात लाँच, काय असतील याची खास वैशिष्ट्ये आणि किंमत?
Ducati 2021 Monster (Photo Credits: Twitter)

जगप्रसिद्ध कंपनी ड्युकाटी (Ducati) नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. Ducati पुढील वर्षात भारतात आपली नवी बाइक लाँच करणार आहे. Ducati 2021 Monster असे या बाइकचे नाव असून 2021 मध्ये ती भारतात लाँच होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या बाईकचा लूक आणि डिझाईन सध्याच्या तरुण पिढीला एकदम साजेसे आहे. या बाईकची (Bike) किंमत 10 लाखांच्या आसपास आहे. बाइकस्वारांमध्ये ड्युकाटी बाइकची प्रचंड क्रेझ आहे. म्हणून आपल्या ग्राहकांना काही तरी नवीन देण्याच्या उद्देशाने ही बाईक भारतात लाँच करण्यात येणार आहे.

ही बाईक दोन व्हेरिएंट्समध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. ज्यामध्ये मॉन्स्टर आणि मॉन्स्टर प्लसचा सहाभाग असणार आहे. Ducati 2021 Monster ला पॉवरसाठी 937cc इंजिन लावण्यात येणार असल्याची शक्यता आहे. जे 9,250rpm वर 110bhp आणि 6,500rpm वर 93 Nm पीक टॉर्क करेल.हेदेखील वाचा- Datsun च्या 'या' फॅमिली कारवर दिला जातोय 51 हजारांचा बंपर डिस्काउंट, जाणून घ्या किंमतीसह खासियत

कंपनीने आपल्या या मिडलवेट स्ट्रीट फायटर मोटरसायकल रेसिंगची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी बनवली आहे. ग्राहक आपल्या आवडीनुसार, बाईकवर हीटेड ग्रिप आणि डुकाटी मल्टीमीडिया सिस्टमही लावू शकतात. या बाईकचं वजन 18 किलोंनी कमी करण्यात आलं आहे. त्यासाठी बाईकची नवी फ्रेम Panigale V4 पासून प्रेरिक आहे. ज्यामुळे आता बाईकचं वजन 166 किलो आहे.

Ducati 2021 Monster बाईक भारतीय बाजारात येताच ती

Triumph Street Triple R शी स्पर्धा करणार आहे.