नवी Suzuki Hayabusa च्या लॉन्चिंगपूर्वी फोटो इंटरनेटवर लीक, भारतातील नागरिकांकडून केली जातेय प्रतिक्षा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

Suzuki Hayabusa Teased ahead of Launch: देशात फेब्रुवारी महिन्यात काही महत्वाची वाहने लॉन्चिंग केली जाणार आहेत. ज्यामध्ये दुचाकींचा सुद्धा समावेश असणार आहे. अशातच काही दिवसांपूर्वी सुजुकी कंपनीच्या हायाबुसाचे प्रीमियम 5 फेब्रुवारीला असणार आहे असे समोर आले होते. ज्याचे नुकतेच फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. अधिकृतरित्या त्याचे अनावरण होण्यापूर्वीच त्याचा लूक समोर आला आहे.(Budget 2021: वाहनांच्या Scrap Policy बद्दल अर्थसंकल्पात घोषणा, 20 वर्ष जुन्या खासगी गाड्या हटवल्या जाणार)

सुझुकी हायाबुसाच्या डिझाइन आणि स्टायलिंगमध्ये काही महत्वपूर्ण बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नवी हायाबुसा आपल्या आयकॉनिक नावासह प्रसिद्ध आहेच. पण त्याचे लूक आधीपेक्षा आक्रमक बनवणार आहे. अन्य बदलावांबद्दल बोलायचे झाल्यास, एग्जॉस्ट, नवे हेडलॅम्प क्लस्टरसाठी संशोधित डिझानचा समावेश आहे. बहुतांश मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ,सुजुकी 2021 हायाबुसाला एलईडी हेडलाइट्स, रिडिझाइन करण्यात आलेला फ्युल टँक सुद्धा दिला जाणार आहे.(Mahindra ते Tata कंपनीच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरत होणार लॉन्च, फुल चार्जिंग मध्ये देणार जबरदस्त रेंज)

भारतीय ग्राहकांकडून या बाइकची प्रतिक्षा केली जात आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच भारतात ही सुपर बाइक लॉन्च करणार आहे. कारण देशात Suzuki Hayabusa ची प्रचंड मागणी आहे. इंजिन बद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये नवे उत्सर्जन मानकांच्या रुपात नवे इंजिन दिले जाणार आहे. ही बाइक सर्वात आधी युरोप, युससए आणि अन्य बाजारांमध्ये बंद केली होती.पण सध्या ही जबरदस्त बाइक पुन्हा एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. कंपनी यामध्ये 200 बीएचपीच्या आसपास पॉवरसह नवा लिक्विड कूल्ड 1440 सीसी इंजिनचा वापर केला जाणार आहे.