महिंद्राच्या 'या' कारवर 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार सूट आणि कॅशबॅक

सणाच्या दिवसात विविध वस्तूंवर ग्राहकांना भरघोस सूट दिली जाते. तर आता महिंद्रा या कंपनीनेसुद्धा त्यांच्या या कारच्या मॉडेलवर सूट आणि कॅशबॅक देण्याचे ठरविले आहे.

महिंद्राच्या 'या' कारवर 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार सूट आणि कॅशबॅक
महिंद्रा कार ( फोटो सौजन्य-फेसबुक)
सणाच्या दिवसात विविध वस्तूंवर ग्राहकांना भरघोस सूट दिली जाते. तर आता महिंद्रा या कंपनीनेसुद्धा त्यांच्या या कारच्या मॉडेलवर सूट आणि कॅशबॅक देण्याचे ठरविले आहे.

महिंद्रा केयूवी 1000

महिंद्राने खास दिवाळीसाठी महिंद्राच्या K2 आणि K4 या कारच्या मॉडेलवर 20-26 हजारांपर्यंत सूट देण्यात आली आहे. तसेच ऐक्सेंज ऑफर दिली असून 29 हजार रुपयांची सूट मिळणार आहे.

महिंद्रा टीयूवी 300

महिंद्रा कंपनाच्या या मॉडेलवर 38 हजार रुपये  कॅशबॅक देण्यात येणार आहे. तर 15 हदार रुपयांपर्यंत एक्सेंज ऑफर मिळणार आहे. तर 5000 हदार रुपयांचे कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येणार आहे.

महिंद्रा मराजो

महिंद्राने काही दिवसांपूर्वीच एमयूवी मराजो ही कार लॉंच केली आहे. तर या कारचे डिझाईन शार्क माश्याप्रमाणे आहे. तसेच मराजोची किंमत 9.99 - 13.9 लाख रुपये आहे. मात्र या कारवर १५ हजार रुपये ऐक्सेंज ऑफर दिली जात आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ

महिंद्राची स्कॉर्पिओ ही कार नेहमीच ग्राहक आणि कंपनीसाठी खरेदी विक्रीसाठी फायदेशीर ठरली आहे.  तर या कारवर 40 हजार रुपयापर्यंत कॅश डिस्काउंट दिला जात आहे.

महिंद्रा एक्सयूवी 500

या कारवर 45 हजार रुपये डिस्काउंट ऑफर आहे ज्यामध्ये 10 हजार कॅश डिस्काउंट आणि 25 हजार बोनस डिस्काउंट दिला जात आहे. त्याचबरोबर 10 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2018 06:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).