Rahul Bajaj Passes Away: प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचे निधन, वयाच्या 83 व्या वर्षी पुणे येथे घेतला अखेरचा श्वास
Rahul Bajaj | (File Image)

Rahul Bajaj Passes Away: प्रसिद्ध उद्योजक, बजाज समूहाचे राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे पुणे येथे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. बजाज उद्योग (Bajaj Group) समूहाला नावारुपास आणण्यास आणि त्यांचा विस्तार करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा राहिला आहे. बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी 1968 पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जवळपास पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी बजाज उद्योग समूहात कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. बजाज उद्योगाचा इतिहास राहुल बजाज यांच्या नावाला वगळून लिहिताच येणार नाही.

राहुल बजाज यांनी बजाज उद्योग समूहाचा वाहन क्षेत्रामध्ये विस्तार करण्यासाठी मोठे योगदान दिले. 10 जून 1938 मध्ये जन्मलेल्या बजाज यांनी अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. पुढे त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून 'एमबीए'चेही शिक्षण घेतले. त्यांना 2001 मध्ये 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. (हेही वाचा, Janardhan Bhoir: हा पठ्ठ्या आता हेलिकॉप्टरने दूध विकणार! भिवंडी येथील शेतकरी उद्योजक जनार्दन भोईर यांची Success Story)

ट्विट

राहुल बजाज यांनी गतवर्षी बजाज ऑटो कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. बजाज उद्योग समूहासोबत त्यांचा पाच दशकांपासूनचा स्नेह राहिला आहे. प्रदीर्घ काळ बजाज ऑटोसोबत काम केल्यानंतर त्यांनी मोठ्या विश्वासाने आपल्या 67 वर्षीय मुलगा नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोची धुरा सोपवली आणि ते निवृत्त झाले. त्यांच्या जाण्याने उद्योग क्षेत्रासह राजकीय क्षेत्रालाही धक्का बसला आहे.