Car Subscription Service: महाराष्ट्रातील 'या' शहरामध्ये Maruti Suzuki ने सुरु केली कार सबस्क्रिप्शन सेवा; जाणून घ्या काय आहे योजना
Maruti Suzuki logo (Photo Credits: Wikimedia Commons)

देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशातील हैदराबाद (Hyderabad) आणि पुणे (Pune) या दोन नवीन शहरांमध्ये आपली कार सबस्क्रिप्शन सेवा (Car Subscription Service) सुरू केली आहे. आता कंपनीच्या गाड्या पुणे आणि हैदराबादमध्ये लीजवर घेता येऊ शकतील. कंपनीने यापूर्वी ऑरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस इंडियाशी करार केला होता. या करारानुसार कंपनीने देशातील गाझियाबाद, नोएडा, दिल्ली, फरीदाबाद आणि बेंगळुरू येथे ही सेवा सुरू केली. या सणासुदीच्या हंगामात कंपनीने लोकांसाठी ही विशेष योजना आणली आहे. मंगळवारी कंपनीने याबाबत घोषणा केली.

कंपनीने यंदा 24 सप्टेंबर रोजी आपल्या सबस्क्रिप्शन सेवेची योजना जाहीर केली होती. त्यावेळी कंपनीने ही योजना देशातील काही शहरांमध्येच सुरु केली होती. आता कंपनी दावा करीत आहे की भविष्यात ही सेवा मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या योजनेवर विचार करत आहे. कंपनीने सध्या ही सेवा पुणे आणि हैदराबाद येथील जनतेसाठी सुरु केली आहे. एका अहवालानुसार, कंपनी सुमारे 60 शहरांमध्ये आपल्या सबस्क्रिप्शन सेवेचे जाळे पसरविण्याच्या योजनेवर काम करीत आहे.

सब्सक्रिप्शन सर्व्हिस प्लानच्या अंतर्गत दोन वर्षांच्या कालावधीत कंपनीच्या कारची लीज घेतली जाणे शक्य आहे. उदाहरणार्थ स्विफ्ट (LXI) मॉडेल आपण दोन वर्षांच्या लीजवर घेत असाल तर, त्याबद्दल दरमहा 14 हजार हफ्ता द्यावा लागेल. या अंतर्गत झिरो डेप्रिसिशन विमा, देखभाल आणि रोड असिस्टंटचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, लीज मुदतीच्या शेवटी पुन्हा कार भाड्याने दिली जाऊ शकते. तसेच भाड्याने घेतलेली कार सध्याच्या बाजार भावानेही खरेदी करता येईल. (हेही वाचा: Royal Enfield Interceptor पेक्षा स्वस्त किंमतीत खरेदी करता येणार BMW G 310 R स्पोर्ट्स बाइक, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)

या योजनेंतर्गत कंपनी केवळ निवडक गाड्याच भाड्याने देणार आहे. यामध्ये Swift, Dzire, Vitara Brezza, Ertiga, Baleno, Ciaz and XL6 या गाड्यांचा समावेश आहे. सबस्क्रिप्शन प्लॅन हा निवडलेल्या कारनुसार 12 महिन्यांपासून 48 महिन्यांच्या दरम्यान असू शकतो.