Bajaj Pulsar 150 Twin Disc1 (Archived, representative image)

बजाज (Bajaj) ऑटो कंपनीने त्यांच्या पल्सर (Pulsar) आणि अॅव्हेंजर (Avenger) मॉडेलमधील सर्वांच्या किंमतीत वाढ केली आहे. वाढ केलेल्या किंमती 998 रुपयांपासून ते 4000 हजार रुपयापर्यंत आहे. बजाज 150 आणि अॅव्हेंजर 160 स्ट्रीट यांच्या किंमतीत 998 रुपयांनी वाढ केली आहे. तर पल्सर 150 Neon बाईकच्या किंमती 4000 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. त्याचसोबत Dominar 400 ची किंमत 10 हजार रुपयांनी वाढवल्याने ती आता 1.90 लाख रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

तर जाणून घ्या बजाज कंपनीच्या पल्सर आणि अॅव्हेंजर मॉडेलमधील कोणत्या बाईकच्या किंमतीत किती वाढ झाली आहे. बजाज ही ऑटोमोबाईल सेक्टर मधील सर्वात जुनी आणि जगप्रसिद्ध कंपनी असून प्रत्येक वेळी ग्राहकांसाठी नव्या मॉडेलमधील बाईक लॉन्च करत असते.

>>Pulsar Neon च्या किंमतीत 4 हजार रुपयांनी वाढ

बजाज कंपनीच्या पल्सर निऑन या बाईकची किंमत 4 हजार रुपयांनी वाढवली आहे. तर दिल्ली येथे या बाईकची एक्स-शोरुम किंमत 71,200 रुपये होती. मात्र आता किंमतीत वाढ केल्याने ती 75,200 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

>>Pulsar 180F ची किंमत 1,100 रुपयांनी वाढली

Pulsar 150 Twin Disc या बाईकची एक्स-शोरुम किंमत यापूर्वी 88,838 रुपये होती. मात्र आता किंमतीत वाढ केल्याने 89,837 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तसेच Pulser 150F या बाईकची एक्स-शोरुम किंमत यापूर्वी 95,290 रुपये होती. मात्र आता किंमत वाढल्याने ती 96,390 रुपयांना खरेदी करता येणार आहे.(खुशखबर! Maruti Suzuki पासून Hyundai पर्यंतच्या गाड्यांवर मिळत आहेत 4 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स)

तसेच बजाज कंपनीची Avenger 220 Cruise बाईकची किंमत 1197 रुपयांनी महागली आहे. यापूर्वी दिल्ली येथे या बाईकची एक्स-शोरुम किंमत 1,03,891 रुपये होती. मात्र किंमत वाढल्याने ती ग्राहकांना 1,05,088 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचसोबत Avenger 220 Street या बाईकची किंमत 1197 रुपयांनी वाढवली असून ती 1,05,088 रुपये झाली आहे. Avenger 160 Street यांच्या किंमतीत 998 रुपयाने वाढवली असून ती 83,251 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.