Margaret Keenan Received First Shot of COVID-19 Vaccine in UK (Photo Credits: BBC Breakfast)

युके (UK) मध्ये नियमकांकडून कोविड 19 लस Pfizer-BioNTech ला मान्यता मिळाल्यानंतर आता लसीकरणाला सुरूवात झाली आहे. दरम्यान यामध्ये आज (8 डिसेंबर) 90 वर्षीय मार्गारेट कीनन (Margaret Keenan) या आजीबाईंना पहिली लस टोचण्यात आली आहे. सेंट्रल इंग्लंड मधील कॉवेंट्री येथील स्थानिक हॉस्पिटलमध्ये त्यांना ही कोविड 19 लस टोचण्यात आली आहे. दरम्यान अजून एक खास योगायोग म्हणजे पुढील आठवड्यातच मार्गारेट या आपला 91 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यामुळे हे लसीकरण त्यांच्यासाठी बेस्ट बर्थ डे गिफ्ट असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. Hari Shukla, 87 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीचा युकेच्या Newcastle Hospital मध्ये प्रथम Pfizer-BioNTech ची कोविड 19 लस मिळणार्‍यांच्या यादीत समावेश

युके मध्ये आजपासून लसीकरणाला सुरूवात झाली आहे. यामध्ये 80 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ केअर होम मधील काही कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांचा समावेश असणार आहे. युके मध्ये सध्या 70 हॉस्पिटल्समध्ये लसीकरण सुरू झालं आहे. सध्या जगात कोविड 19 ला रोखण्यासाठी लसीकरणाला सुरूवात करणारा युके हा पहिला देश ठरला आहे.

इथे पहा व्हिडिओ

युके मध्ये 2 डिसेंबरला नियमकांकडून तातडीच्या वापरासाठी अमेरिकन कोविड 19 लस Pfizer-BioNTech च्या वॅक्सिनला मंजुरी मिळाली होती. ही लस पहिल्या आठवड्यात अंदाजे 8 लाख डोसेस साठी सज्ज असेल. तर महिन्या अखेरीस युके मध्ये 4 कोटी डोस उपलब्ध असतील अशी माहिती देण्यात आली आहे.