Maha Mumbai Metro WhatsApp Ticketing

मुंबईमध्ये मेट्रोने (Mumabi Metro) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बाब आहे. महा मुंबई मेट्रोने (Maha Mumbai Metro) एक नवीन व्हॉट्सॲप तिकीट प्रणाली सुरू केली आहे, ज्यामुळे प्रवाशांना फक्त एका साध्या ‘हाय’ संदेशाद्वारे तिकिटे खरेदी करता येणार आहेत. मंगळवारी सोशल मिडिया एक्स द्वारे याबाबत माहिती देण्यात आली. ही बाब रांगा आणि कागदी तिकिटे दूर करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक होईल. या पोस्टमध्ये, महा मुंबई मेट्रोने व्हॉट्सॲपद्वारे तिकिटे मिळविण्यासाठी सोप्या स्टेप्स शेअर केल्या आहेत. महा मुंबई मेट्रोने दिलेल्या नंबरवर संदेश पाठवून. ही नवीन प्रक्रिया प्रवास सुलभ करते.

अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘आता नाहीत लांब रांगा, ना कागदी तिकिटे- फक्त एक WhatsApp संदेश आणि व्हा प्रवासाला सज्ज! फक्त या 86526-35500 क्रमांकावर ‘Hi’ पाठवा, आणि तिकिटासाठी रांगेत प्रतीक्षा न करीता त्वरीत प्रवासाला सुरुवात करा.’

जाणून घ्या व्हॉट्सॲपद्वारे तिकिटे कशी बुक कराल:

सर्वप्रथम 86526-35500 हा व्हॉट्सॲप नंबर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करा.

व्हॉट्सॲप उघडा आणि सेव्ह केलेल्या नंबरवर एक साधा ‘Hi’ मेसेज पाठवा.

महा मुंबई मेट्रो अनेक पर्यायांसह उत्तर देईल.

यामध्ये तिकीट खरेदी करा, तिकीट मिळवा, शेवटचा व्यवहार असे पर्याय दिसतील.

तिथून 'तिकीट खरेदी करा' पर्याय निवडा.

नंतर तुम्हाला ‘येथे क्लिक करा’ असा संदेश असलेली एक लिंक मिळेल.

त्यावर क्लिक करून तुमचे बोर्डिंग आणि डेस्टिनेशन स्टेशन निवडा.

तुमचे स्टेशन निवडल्यानंतर, तुमची तिकीट खरेदी अंतिम करण्यासाठी ‘सुरू ठेवा’ वर क्लिक करा.

पेमेंट पद्धतीबद्दल:

तुमच्या तिकिटाच्या तपशीलांचे पुनरावलोकन करा आणि पेमेंट पद्धत निवडा.

‘पुनरावलोकन करा आणि पैसे द्या’ वर क्लिक करा आणि युपीआय, कार्ड, वॉलेट द्वारे सुरक्षितपणे पैसे द्या. (हेही वाचा: Thane-NMIA Elevated Corridor: बांधला जाणार ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणारा 26 किलोमीटरचा उन्नत मार्ग; CIDCO ची योजना)

त्यानंतर तुम्हाला तुमचे क्यूआर तिकीट प्राप्त होईल.

दरम्यान, मुंबईतील मेट्रो-3,जिला अ‍ॅक्वा लाईन म्हणूनही ओळखले जाते, ती 10 एप्रिल रोजी वरळीपर्यंत पोहोचणार आहे, ज्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतेचा सामना करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, आतापर्यंत, भूमिगत मेट्रो लाईन फक्त वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पर्यंतच कार्यरत होती. या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्णतेसह, मेट्रो-3 वरून प्रवास अधिक सोयीस्कर होईल. हा टप्पा धारावी आणि सिद्धिविनायक मंदिर यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडेल, ज्यामुळे गर्दी आणि प्रवासाचा वेळ कमी होईल. नव्याने पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्यात धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक, ही स्थानके समाविष्ट आहेत.