Photo Credit- X

Jasprit Bumrah Comeback Update: आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात खूपच खराब झाली आहे. संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. त्यातील 2 सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाला सामोर जाव लागल आहे. एम चाहत्यांसह संपूर्म क्रीकेट चाहते आयपीएलमध्ये एकाच खेळाडूची वाट पाहत आहे. तो म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराह (Jasprit Bumrah) कधी मैदानात येतो आणि खेळतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत. त्यात आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे तिन सामने खेळलेला नाही. चाहते चौथ्या सामन्यात बुमराहच्या पुनरागमनाची वाट पाहत होते पण आता चाहत्यांना मोठा धक्का बसत आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी, बुमराह फक्त 2 किंवा 3 सामने गमावू शकेल अशा बातम्या आल्या होत्या. आता तो उर्वरित सामने खेळेल की नाही हे फिक्स नाही.

आकाश दीपचे पुनरागमन

आकाश दीपलाही पाठीच्या दुखापतीचा त्रास आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर दोन्ही वेगवान गोलंदाजांनी कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सिंडे कसोटीच्या बुमराहला पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. आकाश दीपला दुखापतीमुळे खेळता आले नाही. पण ते लवकरच संघात सामील होऊ शकतो. दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवचा देखील आकाश दीप आणि बुमराह प्रमाणे संघात सामील होण्याची निश्चित वेळ नाही.

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन...

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाला विलंब होणार आहे आणि अद्याप कोणतीही विशिष्ट वेळ निश्चित केलेली नाही. परंतु तो एप्रिलच्या मध्यापर्यंत संघात सामील होण्याची अपेक्षा आहे. वैद्यकीय खात्री केल्यानंतरच त्याला खेळवलं जाणार आहे. बुमराह स्वतःही सावधगिरी बाळगत आहे. तो सीओईमध्ये गोलंदाजी करत आहे. पण पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी त्याला जास्त वेळ लागू शकतो.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दुखापत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान सिडनी कसोटीत जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. खरंतर, बुमराहला पाठीचा त्रास होता. ज्यामुळे त्याला सामन्यादरम्यानचं मैदान सोडावे लागले होते. बुमराह सिडनी कसोटीत गोलंदाजीही करू शकला नाही. तेव्हापासून तो टीम इंडियाबाहेर आहे. दुखापतीमुळे बुमराहला 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीलाही मुकावे लागले.