Shivaji Maharaj | File Image

मुघलांच्या आक्रमणाविरूद्ध उभं राहून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 345 वा स्मृतिदिन (Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi) आहे. इतिहासातील नोंदीनुसार, 3 एप्रिल 1680 ही शिवरायांची निधनाची तिथी आहे. हा चैत्र पौर्णिमा अर्थात हनुमान जयंतीचा दिवस होता. त्यामुळे तारखेनुसार, 3 एप्रिल दिवशी शिवभक्त शिवरायांच्या स्मृतीला वंदन करून त्यांच्या पुणतिथीचं औचित्य साधून रयतेच्या सुखासाठी जीवन खर्ची घालणार्‍या शिवबांना मानवंदाना अर्पण करतात. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनी तुम्ही आज WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत या दिवसानिमित्त महाराजांना आदरांजली अर्पण करू शकाल.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. मूठभर मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी 16 व्या वर्षी तोरण गड ताब्यात घेतला आणि तेथूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. बघता बघता मुघलांप्रमाणेच आदिलशाहीचाही महाराष्ट्रात शेवट केला. Shivaji Maharaj Death Anniversary: शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारात या '8' व्यक्तींकडे होती महत्त्वाची जबाबदारी!

छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली

Shivaji Maharaj | File Image
Shivaji Maharaj | File Image
Shivaji Maharaj | File Image
Shivaji Maharaj | File Image
Shivaji Maharaj | File Image

शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आठ मंत्री असलेले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे मंत्री राजांना राज्यकारभारविषयक कामाविषयी सल्ले देत होते. त्यांच्या सल्ल्याने छत्रपती कामकाज करत होते.