Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025 Messages: छत्रपती शिवाजी महाराज 345 पुण्यतिथी निमित्त शिवरायांना अभिवादन करणारे मराठी HD Images, WhatsApp Status

छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 345 वी पुण्यतिथी आहे. शिवरायांनी 3 एप्रिल 1680 दिवशी रायगडावे अखेरचा श्वास घेतला.

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025 Messages: छत्रपती शिवाजी महाराज 345  पुण्यतिथी निमित्त शिवरायांना अभिवादन करणारे मराठी HD Images,  WhatsApp Status

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मुघल आक्रमणांविरूद्ध मोठा संघर्ष केला. रयतेचा राजा अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे देहावसन 3 एप्रिल 1680 दिवशी झाले. वयाच्या पन्नाशीत रायगडावर आजारपणातच शिवरायांचे निधन झाले. जगभरात शिवरायांचा उल्लेख हिंदवी स्वराज्याचा संस्थापक, महान द्रष्टा, चारित्र्यसंपन्न महापुरूष आणि प्रजाहितदक्ष राजा असे केले आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या स्मरण करून त्यांच्या पराक्रमाच्या कथा पुढल्या पिढीपर्यंत पोहचवणं आवश्यक आहे. Facebook Messages, WhatsApp Messages, Status, Quotes द्वारा शिवरायांच्या स्मृतींना अभिवादन करणारे हे खास मराठमोळे मेसेज, इमेजेस (Images) नक्की शेअर करा.

छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 345 वी पुण्यतिथी आहे. शिवरायांनी 3 एप्रिल 1680 दिवशी रायगडावे अखेरचा श्वास घेतला. गनिमी काव्याने शत्रूंशी सामना करत मूठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी परकीय आक्रमणं परतून लावली. तरूण वयातच शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानामध्ये मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. अशा या पराक्रमी राजाला अभिवादन करून त्यांच्या स्मृतींचं आज स्मरण करायला विसरू नका.

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी

जय भवानी
जय शिवाजी!
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
Shivaji Maharaj Punyatithi | File Image

शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतीक,

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना

शत-शत नमन!

 

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिहांसनाधीश्वर… योगीराज…

श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

वैकुंठ रायगड केला…
 लोक देवगण बनला…
 शिवराज विष्णू झाला..
 वंदन त्याला…

त्या मातीत मिसळावा देह माझा
जीवनाचे असे सार्थक व्हावे
चांगल्या कर्माची फळे नको मला
मरण फक्त त्या रायगडावर यावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचा कारभार त्यांचे सुपुत्र संभाजी महाराजांच्या हातामध्ये आला. शिवरायांप्रमाणेच शंभूराजेंनी देखील राज्याचा कारभार सांभाळला आणि विस्तारला. शिवरायांच्या पश्चात त्यांनी मराठा सम्राज्याचा पसारा वाढवला.

(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2025 11:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).