High Profile Twitter Account Hack करणार्‍या अल्पवयीन मुलाच्या विरुद्ध ऑनलाईन सुनावणी दरम्यान स्क्रीन वर लागले Porn, Rap Vidoes
Image For Representation (Photo Credit: File Photo))

फ्लोरिडा (Florida)  मधील एका अल्पवयीन मुलाने अनेक महत्वाची ट्विटर अकाउंट्स हॅक (High Profile Twitter Account Hack) केल्याच्या आरोपावरुन सुरु असलेल्या ऑनलाईन सुनावणीत अचानक पणे स्क्रीन वर XXX Porn Clips व Rap Music Videos सुरु झाल्याची घटना समोर येत आहे. या सुनावणी दरम्यान ऑनलाईन असणार्‍या एका (नाव गुप्त) सदस्याकडुन अचानक प्रेजेंटेशन सुरु झाले आणि त्यावेळी स्क्रीन वर पॉर्न व्हिडिओ सुरु झाल्या हा प्रकार बंंद करण्याचा प्रयत्न केला असता त्यातही वेळ लागत होता अखेरीस न्यायाधिश Christopher. C. Nash यांंनी काही वेळासाठी सुनावणी स्थगित केली होती. काही वेळाने पुन्हा सुनावणी सुरु झाली असता हाच प्रकार घडला अखेरीस कोर्टाकडुन या मुलाला आकारलेल्या दंंडाची रक्कम कमी करुन अंतिम निर्णय देण्यात आला.

XVideos, Pornhub.com & XNXX.com ला Amazon, Netflix पेक्षा जास्त व्ह्युज; जगातील टॉप बिझी वेबसाइट ची 'ही' यादी पहा

दुसरीकडे हा खटला सुद्धा महत्वाचा व वेगळा ठरणारा होता. ग्राहम इवान क्लार्क या 17 वर्षीय मुलाला अनेक ट्विटर अकाउंट्स हॅक करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. ग्राहम याने आजपर्यंत अनेक सेलिब्रिटीज आणि राजकीय नेत्यांचे अकाउंट हॅक करुन त्या माध्यमातुन इतरांना बिट कॉईन व Tampa Bay पाठवण्याची मागणी करणारे ट्विट केले होते. या माध्यमातुन त्याने 3 मिलियन म्हणजेच 30 लाख डॉलर बिट कॉईन कमावले सुद्धा होते त्याला अटक केल्यावर 7,25,000 डॉलरचा दंड आकारण्यात आला होता ही दंंडाची रक्कम अधिक असल्याच्या मुद्द्यावरुन हा खटला सुरु होता.

दरम्यान या प्रकरणात, ग्राहम ने आपले अन्य दोन साथी Mason Sheppard (वय 19) आणि निमा फझेली (वय 22) यांंच्या मदतीने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अ‍ॅमॅझोन CEO जेफ बेरोझ, टेसला CEO ईलॉन मस्क तसेच सेलिब्रिटी किम कार्डेशियन व केन वेस्ट यांचे अकांट्स हॅक केले होते. हा प्रकार 15 जुलै रोजी समोर आला होता तर 31 जुलै रोजी याप्रकरणी ग्राहम याला अटक झाली होती.