World's Most Expensive Sheep: तब्बल साडेतीन कोटींना विकली गेली जगातील सर्वात महागडी मेंढी Double Diamond; स्कॉटलंडच्या लिलावात तीन शेतकऱ्यांनी केली खरेदी (See Pictures & Videos)
World's Most Expensive Sheep Double Diamond (Photo Credits: @herdyshepherd1 Twitter)

मेंढ्यांची (Sheep) किंमतही कोटींमध्ये असू शकते असा विचार कदाचित कोणीही केला नसेल, परंतु आता एक मेंढी लिलावात तब्बल 3,50,000 गिनी (£367,500 किंवा 490,651$) मध्ये विकली गेली आहे. भारतीय चलनात त्याची किंमत साडेतीन कोटी इतकी आहे. असे मानले जात आहे की, ही आतापर्यंतची जगातील सर्वात महागडी मेंढी (World's Most Expensive Sheep) आहे. टेक्सेल (Texel) जातीची ही डबल डायमंड (Double Diamond) नावाची मेंढी गुरुवारी लानार्क येथील स्कॉटिश नॅशनल टेक्सेल सेलमध्ये (Scottish National Texel Sale) तीन शेतकऱ्यांना विकली गेली. अशा मेंढ्यांच्या उच्च गुणवत्तेच्या मांसामुळे ब्रिटीश शेतकऱ्यांमध्ये ती लोकप्रिय आहे.

टेक्सल्स अशी दुर्मिळ जाती आहे, ज्याला जास्त मागणी आहे. ही नेदरलँडच्या किनारपट्टीवरील टेक्सेलच्या छोट्या बेटावर आढळते. सहसा त्यांच्या किंमती 5 अंकांमध्येच असतात, पण यावेळी किंमत जरा जास्तच होती. डबल डायमंड, जो चार्ली येथून चार्ली बोडेनने विकला होता, हा Embryo-Bred कोकरू आहे. या मेंढीला वेकत घेतलेले, प्रॉक्टर्स फार्मचे फ्लॉक मॅनेजर जेफ आयकन यांनी स्काय न्यूजला सांगितले की,  हा 'खास प्राणी’ असल्यामुळे बर्‍याच ब्रीडर्सना डबल डायमंड खरेदी करायचा होता. (हेही वाचा: मकाच्या कणसाचे दाणे काढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली शक्कल; आनंद महिंद्रा यांनी शेअर केला अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ)

डबल डायमंडसाठी संयुक्तपणे बोली लावण्यासाठी त्यांनी दुसर्‍या एका ब्रीडरशी आधीच बोलणी केली होती. परंतु स्कॉटिश नॅशनल टेक्सटाईलची बोली वाढायला लागल्यावर त्यात तिसरा ब्रीडरदेखील सामील झाला. पारंपारिकपणे युनायटेड किंगडममधील लिलावात गिनीमध्ये पशुधन विकले जाते आणि एक गिनी साधारण 1.40 अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. मागील वेळी 2009 मध्ये, 230,000 पौंड किमतीमध्ये एक मेंढी विक्रमी किंमतीसाठी गेली होती. अमेरिकन चलनामध्ये त्याची किंमत 307,000 डॉलर्सपेक्षा अधिक होते. तिचे नाव डेव्हरोनवाले परफेक्शन असे आहे.