प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

World Most Expensive Cars Parking Space: जगातील सर्वात महागडा देश अशी हाँगकाँगची ओळख आहे. या देशात सर्वच वस्तू महाग आहेत. हाँगकाँगमध्ये एका कारसाठी पार्किंग विकत घ्यायचे असल्यास तेथे तब्बल 1 दशलक्ष डॉलर म्हणजे 7 कोटी रुपये मोजावे लागत आहेत. यावरून आपल्याला हाँगकाँगमधील महागाईचा अंदाज आला असेल. ही जागा 134 स्केअर फूट एवढी असून एका स्क्वेअर फूटसाठी 5.10 लाख रुपये मोजावे लागले आहेत. (हेही वाचा - देशातील सर्वात महागडा जमिनीचा व्यवहार; मुंबई येथील 3 एकर प्लॉटसाठी तब्बल 2 हजार 238 कोटी रुपयांची बोली)

‘नेबरहूड एक्स’ या रिअल इस्टेट क्षेत्रावर लक्ष ठेवणाऱ्या कंपनीने ही माहिती दिली. ही पार्किंग स्पेस उद्योगपती जॉनी चेऊंग यांची होती. हाँगकाँगमध्ये जागेची खूप कमतरता आहे. यामुळे तेथील किंमत चौपटीने वाढली आहे, असंही नेबरहूड एक्स या कंपनीने सांगितले आहे.

हाँगकाँग देशात याआधीही अशी घटना घडली आहे. गेल्यावर्षी येथील एका शहरात एका व्यक्तीने 5 कोटी रुपायांना पार्किंग स्पेस विकत घेतला होता. तेव्हा 150 स्केअर फुटाची जागा 5 कोटी 08 लाख 78 हजार रुपयांना विकली गेली होती. हाँगकाँगमध्ये घरांपेक्षा पार्किंगच्या जागेंच्या किंमती जास्त आहेत.

भारतात मुंबईमध्येदेखील पार्किंगचे सर्वाधिक दर आहेत. येथे एका स्क्वेअर फुटाची किंमत 1.2 लाख रुपये आहे. मुंबईमध्ये रोजच्या जीवनातील गोष्टीही इतक्या महागल्या आहेत. येथे जमिनीच्या किमती तर आकाशाला भिडल्या आहेत. बांद्रा, अंधेरी अथवा दक्षिण मुंबई याठिकाणी घर घेण्याचा विचार सर्वसामान्य लोक करूच शकणार नाहीत. अशात गेल्या महिन्यात जापानी कंपनी सुमितोमो (Sumitomo) ने मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (BKC) तीन एकर प्लॉटसाठी 2,238 कोटी रुपयांची बोली लावली होती. या हिशोबाने ही कंपनी प्रति एकर साठी 745 कोटी रुपये देणार आहे. ही देशातील रियल इस्टेट सेक्टरमधील सर्वात मोठी जमीन डील समजली गेली आहे