Ex-Husband On Sale: महिलेने घरासह दिली माजी नवऱ्याला  विकण्याची ऑफर; म्हणाली, 'झाडू-फर्शी पुसेल'
महिलेची घर विक्रीसाठी खास ऑफर (PC - File Image)

Ex-Husband On Sale: अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने आपल्या पतीला घरासह विकण्याची ऑफर दिली आहे. महिलेचे म्हणणे आहे की, जर कोणाला तिचे घर घ्यायचे असेल तर तिला तिच्या पतीला सोबत घ्यावे लागेल. तो घर स्वच्छ करेल आणि त्याच्या नवीन मालकासाठी अन्न शिजवेल. डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, क्रिस्टल बॉल (Crystal Ball) असे घर विकण्याची ऑफर देणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिने तिचा माजी पती रिचर्डसह (Richard) घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिस्टलने घरासह तिच्या EX-पतीला विकण्याची जाहिरातही दिली आहे.

महिलेला तिच्या घरासोबह आपला EX-नवरा का विकायचा आहे?

क्रिस्टलने सांगितले की, 7 वर्षांपूर्वी तिचा रिचर्डपासून घटस्फोट झाला आहे. परंतु, अजूनही अनेक गोष्टी आहेत ज्यात दोघेही समान भागीदार आहेत. या कारणास्तव, तिने घर विकण्यासाठी तिच्या माजी पती रिचर्डला देखील पॅकेजमध्ये समाविष्ट केले आहे. घर विकल्यानंतरही रिचर्डला राहायला जागा मिळावी अशी तिची इच्छा आहे. (हेही वाचा - Shocking! तब्बल 30 वर्षे Toilet मध्ये बनवला जात होता समोसा; प्रशासनाने रेस्टॉरंटला ठोकले टाळे)

क्रिस्टल आणि रिचर्ड हे देखील व्यावसायिक भागीदार आहेत. त्यांना एक मुलगा आहे. क्रिस्टलने सांगितले की, तिने घर विकण्याचा सौदा आकर्षक करण्यासाठी ही जाहीरात केली आहे. मात्र, घर विकणारे काही दलाल माजी पतीसह घराच्या विक्रीला विरोध करत आहेत. असे करणे कायद्याच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

क्रिस्टलने पुढे सांगितले की, तिचे घर विकणारी जाहिरात वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली आहे. कारण, काही लोक पॅकेजमध्ये माजी पतीचा समावेश करण्यास विरोध करत आहेत. पण तिला विश्वास आहे की, तिचे घर खूप चांगले आहे. कोणीतरी तिचे घर नक्कीच विकत घेईल आणि तिच्या माजी पतीला देखील सोबत घेईल.