इंडोनेशियातील (Indonesia) , दक्षिण सुलावेसी प्रांतातील सितेबा गावातील एका महिलेचा मृतदेह चक्क अजगराच्या पोटात (Woman Found Dead Inside Python) आढळून आला. सिरियाती असे या महिलेचे नाव असून ती 36 वर्षांची आहे. धक्कादायक म्हणजे अजगराने (Python) महिलेला गिळण्याची या प्रातात एकाच महिन्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. आपल्या आजारी मुलासाठी औषध घेण्यासाठी सिरीयती मंगळवारी सकाळी घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती कधीच घरी परतली नाही. वाट पाहून थकल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला.
चप्पलमुळे लागला पत्ता
कुटुंबीयांकडून शोध सुरु असतानाच सिरियाती हिचा पती एडियन्सा याला तिची चप्पल आणि पँट त्यांच्या घरापासून 500 मीटर अंतरावर सापडली. "त्यानंतर थोड्याच वेळात, त्याला वाटेपासून सुमारे 10 मीटर अंतरावर एक मोठा साप (अजगर) दिसला. साप अजूनही जिवंत होता आणि त्याचे पोट प्रचंड फुगले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी स्थानिक पोलिसांना मदतीसाठी बोलावले. पोलिसांनी अजगराचे पोट फाडले असता आत सिरियाचा देह मृतावस्थेत आढळून आला. (हेही वाचा, Python Swallows Woman in Indonesia: इंडोनेशियामध्ये 16 फुट महाकाय अजगराने महिलेला पूर्णपणे गिळंकृत केले; पोटात आढळला मृतदेह)
अजगराने मानवास गिळल्याच्या अनेक घटना
अजगराने महिलेला गिळण्याची घटना दुर्मिळ असली तरी, या प्रदेशामध्ये अशा घटना घडल्याचे अनेका सांगितले जाते. गेल्या महिन्यात, इंडोनेशियातील याच प्रांतातील दुसऱ्या दक्षिण सुलावेसी जिल्ह्यात एक महिला जाळीदार अजगराच्या पोटात सापडली होती. त्याच्या आधी मागील वर्षी, रहिवाशांनी आठ मीटर लांबीचा अजगर मारला होता जो एका शेतकऱ्याला आवळून गिळण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, 2018 मध्ये, दक्षिणपूर्व सुलावेसीच्या मुना शहरात 54 वर्षीय महिलेचा मृतदेह सात मीटरच्या अजगराच्या आत सापडला होता. त्याचप्रमाणे, 2017 मध्ये, पश्चिम सुलावेसीमधील एक शेतकरी बेपत्ता झाल्यानंतर पाम तेलाच्या मळ्यात चार मीटरचा अजगर सापडला होता. (हेही वाचा, King Cobra vs Python Viral Pic: किंग कोब्राच्या चाव्यामुळे अजगराचा मृत्य पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ )
Python snake हा Pythonidae कुटुंबातील बिनविषारी सापांचा समूह आहे. हे साप आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात आणि त्यांच्या प्रभावशाली आकारासाठी आणि शिकार करण्याच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. अजगर मानव, म्हैस, यांसारखे छोटे-मोठे प्राणी सहज गिळू शकतात आणि गिळलेला प्राणी गशातून बाहेरही काढू शकतात. हा एक शरीरात हाड नसलेला प्राणी आहे. अजगर हा एक मांसाहारी प्राणी आहे. जगभरामध्ये त्याच्या वेगवेगळ्या जाती पाहायला मिळतात. अलिकडील काही काळात अजगरांच्या अनेक प्रजाती लुप्त झाल्या आहेत. सापाची ही प्रजाती बिनविषारी असली तरी, मांसाहारी असल्याने आणि ती आपल्या भक्ष्यावर तेट हल्ला करत असल्याने धोकादायक समजली जाते. अजगर नेहमी दलदलीच्या ठिकाणी तसेच, घनदाट जंगलामध्ये आढळून येतात.