रशियातून (Russia) बलात्काराची (Rape) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुलीला अंधारकोठडीत कोंडून ठेऊन तब्बल 14 वर्षे तिच्यावर बलात्कार केला गेला आहे. या अंधारकोठडीतून कसेतरी पळून आलेल्या सेक्स स्लेव्हने (Sex Slave) 14 वर्षांच्या तिच्या अत्याचाराची कहाणी कथन केली. या महिलेवर 14 वर्षांपासून 1000 वेळा बलात्कार झाल्याची माहिती मिळत आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, पश्चिम रशियाच्या चेल्याबिन्स्कमध्ये (Chelyabinsk) राहणाऱ्या व्लादिमीर चेस्कीडोव्ह (Vladimir Cheskidov) नावाच्या व्यक्तीने एका मुलीला 14 वर्षे सेक्स स्लेव्ह म्हणून घरात कोंडून ठेवले होते. त्याने या मुलीचे ती 19 वर्षांची असताना तिचे अपहरण केले व आता वयाच्या 33 व्या वर्षी ती कशीतरी घरातून बाहेर पडण्यात यशस्वी झाली. तिने पोलिसांना तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.
महिलेने पोलिसांना सांगितले की, तिला 2009 पासून बंदिवासात ठेवले होते. यादरम्यान तिच्यावर हजाराहून अधिक वेळा बलात्कार झाला. आरोपी व्लादिमीर चेस्कीडोव्हचे वय 51 वर्षे आहे. याआधी 2011 मध्ये याच घरात आणखी एका महिलेची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर आरोपीच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली गेली.
स्थानिक मीडियानुसार, आरोपी चेस्कीडोव्हच्या आईने महिलेला पळून जाण्यास मदत केली. चेस्कीडोव्ह एक दिवस दारूच्या नशेत असताना तळघर लॉक करण्यास विसरला, त्यानंतर पीडिता पळून जाण्यात यशस्वी झाली. या महिलेला फक्त घरातील काम करण्यासाठीच बेडरूममधून बाहेर पडण्याची परवानगी होती. यादरम्यान ती चाकूच्या निशाण्यावर होती. छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून तिचा छळ केला जात, तिला बेदम मारहाण केली जात असे. (हेही वाचा: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; कोळशाच्या भट्टीत जिवंत जाळल्याचा आरोप, तीन जणांना अटक)
बंदीवान महिलेकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्मोलिनो गावात चेस्कीडोव्हच्या एका मजली घरात पोहोचले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्यांना सेक्स टॉईजचा खजिना सापडला. त्याच्याकडे पोर्नोग्राफीच्या अनेक सीडी होत्या. तसेच चेस्कीडोव्हच्या घराच्या तळघरात पोलिसांना मानवी अवशेषही सापडले. आता चेस्कीडोव्हवर खून, बलात्कार आणि अपहरणाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला सध्या एका मानसिक संस्थेत पोलिसांच्या नजरेत ठेवण्यात आले आहे.