मृत्यूनंतर दोन ते तीन दिवसांनंतर अंतिम संस्कार (Funeral) केल्याचं तुम्ही ऐकलं असाल पण तब्बल जवळजवळ तीन महिन्यांनंतर अंतिमसंस्कार हे बाब जरा वेगळी आहे. 8 जुलै रोजी जपानचे (Japan) माजी प्रधानमंत्री शिंजो आबे (PM Shinzo Abe) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तरी मृत्यूच्या तब्बल अडीच महिन्यांनंतर शिंजो आबे यांच्यावर उद्या अंतिम संस्कार (Shinzo Abe Funeral) होणार आहेत. पण आठ वर्षे जपानचे नेतृत्व करणाऱ्या आबे यांच्या अंत्यसंस्कारावर (Funeral) आता जपानी जनता नाराजी व्यक्त करत आहे. तसेच त्यांच्या अंतिम संस्कारावर (Funeral) विरोधी पक्षनेत्यांनी बहिष्कार टाकला आहे. कारण या अंतिम संस्कारासाठी (Funeral) सुमारे 12 लाख डॉलर म्हणजे 97 करोडहून अधिक खर्च होणार आहे. देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येने या खर्चिक अंत्यसंस्काराला (Funeral) विरोध दर्शवला आहे.
पण दुसरीकडे जगभरातील मोठे राजकीय नेते या अंतिम संस्काराला (Funeral) हजेरी लावणार आहेत. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस (Kamala Harris), सिंगापूरचे (Singapore) पंतप्रधान ली सिएन लूंग (Lee Hsien Loong), ऑस्ट्रेलियन (Australia) पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) देखील या अंतिम संस्कार (Funeral) सोहळ्यासाठी टोकियोत (Tokyo) हजेरी लावणार आहे. म्हणून सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर या अंतिम संस्काराचा खर्च अधिक आहे असं सांगण्यात येत आहे. (हे ही वाचा:- Iran Anti Hijab Protests: इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने, उफाळला हिंसाचार; 41 जणांचा मृत्यू, 700 जणांना अटक)
शिंजो आबे (Shinzo Abe) यांची राजकीय कारकीर्द जेवढी वादग्रस्त ठरली त्याप्रमाणे त्यांचा अंतीम संस्कार (Funeral) देखील वादग्रस्त ठरत आहे. तरी शिंजो आबे यांच्यावर जवळपास 78 दिवसांनंतर उद्या अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. तरी संबंधीत विधीचं थेट प्रक्षेपण सीएनएन (CNN), बीबीसी (BBC) तसेच रॉयटर्स यासारखी आंतरराष्ट्रीय माध्यम करणार आहेत.