आता या पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये केवळ लिझ ट्रस (Liz Truss) आणि ऋषी सुनक (Rishi Sunak) असे तीन 2 उमेदवार उरले आहेत. काल म्हणजे शुक्रवारी (Friday) पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील मतदानाचा शेवटचा टप्पा संपला. शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. 1,60,000 सदस्यांनी यासाठी मतदान केलं आहे. तरी मतदानाचा (Voting) निकाल (election Result) सोमवारी जाहीर करण्यात येईल आणि मोठ्या प्रतिक्षेनंतर सोमवारी ब्रिटनला (Britain) मिळणार नवा पंतप्रधान (Prime Minister) मिळणार आहे. लिझ ट्रस आणि ऋषी सुनक यांच्यात काटे की टक्कर बघायला मिळत आहे. बोरिस जॉन्सन (Boris Johnson) सरकारमध्ये लिझ ट्रस (Liz Truss) फॉरेन सेक्रेटरी (Foreign Secretory) तर ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी अर्थमंत्री (Economy Minister) या महत्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला आहे. तरी कोण होणार ब्रिटनचा नवा पंतप्रधान असा प्रश्न संपूर्ण जागला पडला आहे.
बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पासूनच ऋषि सुनक ब्रिटनचे (UK) नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेणार अशी आंतरराष्ट्रीय (International) पातळीवर चर्चा रंगली आहे. ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यास ते भारतीय वंशाचे पहिले ब्रिटनचे पंतप्रधान (Prime Minister) असतील. ब्रिटीश सरकारमध्ये आधी सुनक ज्युनिअर मंत्री होते. त्यांना 2018 साली ब्रिटनचे निवास मंत्री करण्यात आलं. कोरोनाच्या (Corona) काळात ऋषी सुनक यांनी देशाला मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढलं. सर्व विभागांना खूश करण्यात ऋषी सुनक यशस्वी ठरल्याने त्याचे कौतुक झाले आणि नंतर ते ब्रिटेनचे अर्थमंत्री झालेत. अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये (Britain Government) दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. (हे ही वाचा:- NASA आज चंद्रयान Artemis I लॉंच करणार, पहा खास व्हिडीओ)
कोण आहेत ऋषी सुनक?
ऋषी सुनक यांचे पालक आजी-आजोबांसोबत ब्रिटनला (Britain) गेले होते. त्यानंतर 1980 मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला.त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर ऑक्सफोर्ड (Oxford) विद्यापीठातून तत्त्वज्ञान ,राजकारण, आणि अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतलं. नंतर स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं (MBA) शिक्षण पूर्ण केलं.राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी गोल्डमॅन सॅकमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:ची एक गुंतवणूक कंपनी स्थापन केली. ते सरकारमध्ये आधी ज्युनिअर मंत्री होते.