सीएनएन पत्रकाराच्या प्रश्नावर भडकले डोनाल्ड ट्रम्प(Photo Credits: ANI)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्रकार यांच्यामध्ये सातत्याने वाद आणि खटके उडत असल्याच्या अनेक घटना झाल्या आहेत. मात्र नुकतीचीच अमेरिकेत मध्यावधी निवडणूक पार पडली. त्याचे निकाल हाती आल्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि सीएनएन पत्रकार यांच्यामध्ये रंगलेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर या प्रकाराचं व्हाईट हाऊस मधील प्रेस पास रद्द करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

 डोनाल्ड ट्रम्पनी घातलीसीएनएन पत्रकाराशी हुज्जत 

सीएनएनच्या जिम अॅकोस्टा या पत्रकाराने ट्रम्प यांना अमेरिकेतील विस्थापितांबाबत एक प्रश्न विचारला. या प्रश्नाच उत्तर देण्याऐवजी 'मला देश चालवू दे तू सीएनएन चालव' अशा शब्दात उत्तर दिलं. त्यानंतर अॅकोस्टाने २०१६ साली अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील रशियाच्या मदती बाबत प्रश्न विचारला तेव्हा ट्रम्प यांचा राग अनावर झाला. त्याला 'enogh' म्हणत थांबण्याचा प्रयत्न झाला. पुढे व्हाईट हाऊस मधील इजा इंटर्न मुलीने त्याचा माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस ट्रम्प यांनी तू उद्धट आणि असभ्य असून (अमेरिकन) लोकांचा शत्रू असल्याचं मत व्यक्त केलं. हा सारा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. त्याची एक क्लिप ट्विटर वर व्हायरल होत आहे.

 

व्हाईट हाऊस कडून देण्यात आलेल्या माहिती नुसार पत्रकार परिषदेदरम्यान मुलीची गैरवर्तन केल्याप्रकरणी जिम अॅकोस्टा यांचे व्हाईट हाऊसमधील प्रेस पास रद्द  करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र उपस्थित इ तर पत्रकारांनी जिम अॅकोस्टा यांच्यावरील गैर वर्तवणुकीचे आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे अमेरिकेत पुन्हा पत्रकार विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प हा मुद्दा तापण्याचीही शक्यता आहे.