Switzerland Wedding: एक असाही लग्नसोहळा, बर्फाच्या घनांमध्ये वर-वधूची पोझ, पाहूण्यांना बर्फाच्या ग्लासांमध्ये ड्रिंक सर्व (Watch Video)
Photo Credit - Instagram

Switzerland Wedding : बरेच लोक डिस्टिनेशन वेडींगचे स्वप्न पाहतात. काहींना त्यात बॉलीवूड-थीम असलेले कार्यक्रम आवडतात तर काहींना साधे लग्नाचे कार्यक्रम आवडतात. अशाच एका जोडप्याने त्यांचा लग्न सोहळा बर्फाच्छादित (snow)अल्पाइन शिखरांमध्ये(Alpine peak) साजरा केल्याचे समोर आले आहे. लग्नसोहळ्यात अनेक अचंबित करणारे इवेंट आयोजित करण्यात आले होते. लँडस्केपने वेढलेले ते ठिकाण होते. ज्यात कधीच लग्नसोहळा पार पडल्याचे घडले नव्हते. या लग्नाचे अलीकडेच, बर्फाळ पर्वतांनी वेढलेल्या स्वित्झर्लंड(Switzerland)मधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल(Viral wedding entry Video) झाले आहेत. (हेही वाचा:Ebrahim Raisi: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, परराष्ट्र मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांचाही समावेश )

इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये दिसते की बर्फाच्या घनातून वधूचा नाट्यमय प्रवेश होतो. त्यातनंतर ते दोघे फोटोशूट करतात. त्याशिवाय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची थीम देखील बर्फाळ प्रदेशाला योग्य ठरेल अशीच होती. संगीत कार्यक्रमामध्ये वेगवेगळे परफॉर्मन्स दाखवले होते.

बर्फापासून डेकोरेशन करण्यात आले होते. वर-वधूसाठी बर्फाचा मार्ग तयार करण्यात आला होता. व्हायोलिन वादकांचे लग्नात परफॉर्मंस झाले. 16 एप्रिल रोजी शेअर केल्यापासून, या पोस्टला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 24,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

त्यावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत. "यामुळे खूप प्रभावित झालो!!!!!!" असे एका वापरकर्त्याने लिहिले. दुसऱ्याने "सुंदर," असे लिहिले. एक तिसरा म्हणाला की, "ती एक काल्पनिक गोष्ट आहे जी मी वास्तविक जीवनात पाहिली, हे मला आवडले". "ते गोठत नव्हते का?" असे एका वापरकर्त्यांने म्हटले. एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने सांगितले की, "हे लग्न किती सुंदर आणि वेगळ्या पद्धतीचे आहे हे सांगण्यासाठी शब्दच नाहीत!! पुढचे संपर्ण आयुष्य एकत्र साजरे करण्यासाठी वधू-वरांचे अभिनंदन."

 

View this post on Instagram

 

A post shared by LEBANESE WEDDINGS (@lebaneseweddings)