फाईल फोटो (Photo credits: PTI)

भारतीय बँकांना चुना लावून पळालेला विजय मल्ल्या (Vijay Mallya)  ब्रिटेनमध्ये पसार झाला आहे. मात्र मल्ल्याच्या लंडनमधील अलिशान घरावर जप्ती येणार असल्याने त्याला धक्का बसला आहे. तर या घरासंबंधित त्याची स्विस बँक यूबीएस विरोधात कायदेशीर कारवाई सुरु आहे.

विजय मल्ल्याने कर्जाची परत फेड न केल्याने यूसीबी बँकेने घरावर जप्ती आणण्यासाठी कारवाई केली होती. मात्र या कारवाईला मल्ल्याने विरोध केल्याने बँकेने युकेच्या उच्च न्यायालयात याबदद्ल याचिका दाखल केली. त्यामुळे लवकरच लंडनमधील कॉर्नवॉल टेरेससह असलेल्या अलिशान बंगल्यावर जप्ती येणार आहे. तर रोज कॅपिटल वेंचर्स स्विस बँकमधून यूबीएसकडून त्याने 195 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच रोज कॅपिटल वेंचर्स हे त्याच्या मालकीचे असून त्याने लंडनमधील घर गहाण म्हणून ठेवले होते.

मात्र मल्ल्याने या कर्जासुद्धा परतफेड न केल्याने यूबीसी बँकेने जून 2016 रोजी कर्जाची प्रक्रिया बंद करत, लंडनमधील घराच्या जप्तीसाठी कारवाई सुरु केली होती.