USA: अमेरिकेतील मंदिरात 11 वर्षाच्या मुलाला गरम सळीने दिले चटके; वडिलांनी गुन्हा दाखल करून केली 10 लाख डॉलर्सची भरपाईची मागणी
लोखंडी सळी (प्रातिनिधिक- संग्रहित संपादित प्रतिमा)

अमेरिकेतील टेक्सासमध्ये (Texas-USA) एका 11 वर्षाच्या मुलाला गरम सळीने चटका दिल्याबद्दल या मुलाच्या वडिलांनी हिंदू मंदिर आणि त्याच्या मूळ संघटनेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून. वडिलांनी 10 लाख डॉलर्सची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. फोर्ट बेंड काउंटीमध्ये राहणारे विजय चेरुवू म्हणाले की, गेल्या ऑगस्टमध्ये टेक्सासमधील शुगरलँड येथील श्री अष्टलक्ष्मी हिंदू मंदिरात एका धार्मिक समारंभात त्यांच्या मुलाला गरम लोखंडी रॉडने चटका देण्यात आला होता.

यामुळे मुलाला तीव्र वेदना झाल्या आणि कायमचे विद्रूपीकरण झाले. आता मुलाच्या वडिलांनी मंदिर आणि त्याची पालक संस्था, जीर एज्युकेशनल ट्रस्ट (जेईटी) यूएसए, इंक यांच्यावर दावा दाखल केला. खटला 1 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त नुकसानीची मागणी करत आहे.

पत्रकार परिषदेत मुलाच्या वडिलांनी सांगितले की, या घटनेने आपल्याला धक्का बसला आहे आणि ही बाब कशी हाताळावी हे कळेनासे झाले आहे. आपले मूल सुदृढ राहावे ही पालकांची पहिली प्राथमिकता असते. मात्र आता मुलाच्या खांद्यावर भाजलेले डाग दिसत आहेत. खटल्यात, वडिलांनी दावा केला की मंदिरातील या समारंभात 100 लोक सहभागी झाले होते, ज्यात त्यांचा मुलगा आणि तीन मुलांचा समावेश होता. (हेही वाचा: Taiwan Earthquake Video: रुग्णालयात नवजात बाळांचा नर्संनी वाचवला जीव, भूकंपाचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले)

याबाबत चेरुवू यांचे वकील, ब्रँड स्टोन्गर यांनी सांगितले की, मुलाला दोन्ही खांद्यावर भाजले आहे, ज्यामुळे त्याला खूप वेदना झाल्या आणि कायमचे विद्रूपीकरण आले. यामुळे मुलाला संसर्ग देखील झाला. वकिलाने पुढे सांगितले की, मुलाने त्याच्या आईसोबत कार्यक्रमाला हजेरी लावली होती, जिथे त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध चटके देण्यात आले होते आणि त्याच्या वडिलांची परवानगीही घेण्यात आली नव्हती किंवा त्यांना याबद्दल माहितीही देण्यात आली नव्हती. ब्रँड स्टोन्गरच्या मते, टेक्सासमध्ये पालकांच्या परवानगीनेही मुलांना चटके देणे, टॅटू काढणे किंवा त्यांना घाबरवणे बेकायदेशीर आहे.