Joe Biden Insults Journalist: पत्रकाराने विचारलेल्या महागाईच्या प्रश्नानांवर भडकले राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, पत्रकाराला केली शिवीगाळ (Watch Video)
Joi Biden (Photo Credit - Twitter)

सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये (White House) आर्थिक सल्लागारांसोबत झालेल्या बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) हे पत्रकाराला (Journalist) शिवीगाळ करताना दिसले. फॉक्स न्यूजच्या पत्रकाराने त्यांना महागाईबाबत प्रश्न विचारताच बायडन संतापले आणि त्यांनी शिवीगाळ केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो बायडेनच्या भडकण्याचे कारण म्हणजे कोरोना महामारीसोबतच (Covid Pandemic) महागाईचा दर वाढल्याने अमेरिकेला सध्या विक्रमी महागाईचा सामना करावा लागत आहे. किंबहुना, देशातील सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे मध्यावधी निवडणुकीत तुमच्या पक्षाचे किती नुकसान होईल, असा प्रश्न पत्रकाराने बायडेन यांना विचारला. यावर बायडेन म्हणाले की, यामुळे नुकसान होणार नाही, पण फायदा होईल. यानंतर त्यांनी पत्रकाराविरोधात अपशब्द वापरले.

यानंतर प्रश्न विचारणारा पत्रकार बाहेर पडताना ओरडताना ऐकू आला. पत्रकार ड्यूसीने नंतर फॉक्स न्यूजच्या दुसर्‍या रिपोर्टर ब्रेट बेअरला सांगितले की इतर पत्रकारांनी त्यांना अध्यक्षांनी काय सांगितले ते सांगावे लागले कारण त्यांना आवाजामुळे काहीही ऐकू येत नव्हते. (हे ही वाचा COVID-19 Pandemic: युरोपमध्ये कोरोना व्हायरस महामारी अंताच्या दिशेने: WHO)

Tweet

अमेरिकन मीडियामध्ये खळबळ

या घटनेनंतर बायडेन यांनी तक्रार केली की, मला प्रश्नाची अडचण नाही, पण मी बैठक का आणि कोणत्या मुद्द्यावर बोलावली आहे, याची माहिती पत्रकार कधीच देत नाहीत. राष्ट्राध्यक्षांच्या या विधानामुळे अमेरिकन मीडियामध्ये खळबळ उडाली असून त्यांना यासाठी माफी मागावी लागू शकते. मात्र, व्हाईट हाऊसने याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. कदाचित अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आपला माईक चालू असल्याची जाणीव झाली नसेल आणि त्याचे उत्तर जगजाहीर झाले.

मात्र, या प्रश्‍नानंतर लगेचच पत्रकार परिषदेत मोठा गदारोळ झाला, त्यामुळे अध्यक्ष काय म्हणाले, याबाबत फारसे कोणी ऐकू शकले नाही. व्हाईट हाऊसने वारंवार आग्रह केला आहे की आपले लक्ष महागाई रोखण्यावर आहे. बायडेन यांनी या मुद्द्यावर त्यांचा संपूर्ण आर्थिक अजेंडा पुन्हा मांडला आहे. पण राष्ट्रपती प्रसारमाध्यमांबद्दल सांगत राहतात कि फॉक्स न्यूजसारख्या वाहिन्यां सरकारवर खुप टीका करतात.