Joe Biden | (Photo Credits: Facebook)

US: जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एक सध्या मोठा उपाय असल्याचे म्हटले जात आहे. अशातच अमेरिकेत आता बूस्टर डोस (Booster Dose) देण्यावर अधिक भर दिला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन ( Joe Biden) यांनी सोमवारी कोरोनावरील लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. त्याचसोबत सर्व योग्य लोकांनी सुद्धा तो घ्यावा असे आवाहन केले आहे.(UAE First Hindu Temple: अबू धाबी येथे उभारले जात आहे पहिले हिंदू मंदिर; 1000 वर्षे टिकेल, जाणून घ्या वैशिष्ठ्ये Watch Video)

कोरोना लसीचा बूस्टर डोस घेतल्याची माहिती जो बिडेन यांनी स्वत: ट्विट करत दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, मी आज कोविड19 लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोस प्रमाणे बूस्टर डोस सुद्धा सुरक्षित आणि सोप्पा आहे. लसीकरण करुन घ्या. आपण सर्वजण मिळून आयुष्य वाचवू शकतो आणि कोरोनाला हरवू शकतो. ज्यांना कोरोनामुळे अधिक धोका आहे अशा लोकांसाठी बूस्टर डोस हा अधिक फायदेशीर ठरु शकतो. यासाठीच मला बूस्टर डोस दिला गेला आहे. त्याचसोबत तुम्ही प्रत्येकाला लसीकरणासाठी सुद्धा प्रोत्साहित करा जे लस घेण्यासाठी योग्य आहेत.

Tweet:

78 वर्षीय जो बिडेन यांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस गेल्या वर्षात 21 सप्टेंबरला घेतला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्षचा पदभार स्विकारण्यापूर्वी 11 जानेवारीला दुसरा डोस घेतला होता. त्याचसोबत त्यांची पत्नी जिल बिडेन यांनी सुद्धा लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.(UK Government कडून Travel Advisory मध्ये बदल करत Covishield चा Approved Vaccine मध्ये समावेश; भारतीयांना Quarantine चे नियम राहणार)

जो बिडेन यांनी बूस्टर डोस घेतल्यानंतर लोकांना लस घेण्यासाठी आवाहन केले आहे. त्यांनी असे म्हटले की, आतापर्यंत 77 टक्क्यांहून अधिक वयस्कर नागरिकांनी कमीत कमी एक डोस घेतला आहे. तर 23 टक्के नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही. हे देशासाठी नुकसानकारक आहे. त्याचसोबत जर तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये फायजरची लस घेतली असल्यास आणि तुमचे वय 65 वर्षाहून अधिक असेल. या व्यतिरिक्त आजारी किंवा फ्रंटलाइन वर्कर्स असाल तर तुम्हाला बूस्टर डोस घेता येणार आहे.