US Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना
united states flag | Image For Representation (Photo Credits: File Image)

Sikhs in US Census 2020: अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या शिख समुदयासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेमध्ये 2020 (US Census 2020) मध्ये होणाऱ्या जनगणनेत शिख समुदयाची अल्पसंख्याक समूह म्हणून पहिल्यांदाच गणना (US census Sikh Population) केली जाणार आहे. 'शिख सोसायटी ऑफ सान डिएगो' चे बलजीत सिंह यांनी ही माहिती दिली आहे. अल्पसंख्याक समुदायासंदर्भात काम करणाऱ्या एका संघटनेने याला अमेरिकेतील शिख समुदयासाठी मैलाचा दगड आहे असे म्हटले आहे.

बलजीत सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, अमेरिका सरकारच्या या निर्णयामुळे केवळ शिख समुदायच नव्हे तर अमेरिकेत राहणाऱ्या इतर जातीधर्माच्या समुहांसाठीही पुढे येण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. अल्पसंख्यक समुदयासाठी काम करणारी संघटना 'यूनायटेड सिक्ख' या संस्थेने या निर्ययाचे स्वागत करतानाच शिख समुदयाच्या प्रगतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेसोबत अल्पसंख्यक समुदयाचीही जनगणना होणार असल्याचे 'यूनाइटेड सिक्ख' संस्थेने म्हटले आहे. (हेही वाचा, All is Well! सध्या तरी आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुसज्ज सैन्य; इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं सूचक ट्विट)

'यूनायटेड सिख्स' च्या एका प्रतिनिधी मंडळाने यूएस सेन्सससोबत एक बैठक नुकतीच घेतली. ही बैठक सान डिएगो येथे सहा जानेवारी या दिवशी पार पडली. यूएस सेन्सचे उप निदेशक रोन जार्मिन यांनी म्हटले आहे की, अमेरिकेत शिख समुदयाची संख्या निश्चित करण्यासाठी आणखी एका गणनेची आवश्यकता आहे. यूनायटेड सिक्सने केलेल्या दाव्यानुसार अमेरिकेत शिख समुदायाची संख्या सुमारे 10 लाखांच्या आसपास आहे.