California News: कॅलिफोर्नियातील प्रसिध्द बारमध्ये सामुहिक गोळीबार, 5 जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमेत
California Mass shooting PC twitter

California News: कॅलिफोर्नियातील (California ) ऑरेंज काउंटीच्या ट्रॅबुको कॅनियनमधील बारमध्ये सामूहिक गोळीबार (Shooting) झाला. ही घटना सॅंटियागो कॅनियन रोडवरील कुक्स कॉर्नर येथे घडली,गुरुवारी ही घटना बार मध्ये घडली आहे. वृत्तानुसार, बारमध्ये स्पेगेटी नाईट सुरू असताना सामूहिक गोळीबार झाला. या हल्ल्यात सुमारे पाच जणांना जीव गमवावा लागल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हादरलं आहे.  जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात सुमारे सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली  आहे. गोळीबार करणारा हा निवृत्त कायदा अंमलबजावणी अधिकारी असल्याचे वृत्त आहे. निवृत्त कायदा अंमलबजावणी अधिकारी आणि त्यांची पत्नी यांच्यात झालेल्या भांडणानंतर गोळीबार झाला. वाद वाढल्यानंतर अधिकाऱ्याने अकरा जणांवर गोळीबार केला.

ट्रॅबुको कॅन्यनमधील कुक्स कॉर्नर येथे झालेल्या गोळीबार घटनेत अनेक जण जखमी झाले आहे.  जखमी झालेल्यांना सहा नागरिाकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार झालेल्या घटनास्थळाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनास्थळी ४ जणांचा मृत्यदेह  पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.