दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेल्या संशयीत डॉक्टरकडून 4 हजार महिलांची नसबंदी; श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशीही संबंध
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

श्रीलंकेतील (Sri Lanka) डिव्हाईन या आघाडीच्या वृत्तपत्राने दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेल्या संशयीत डॉक्टरांकडून 4 हजार महिलांची नसबंदी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या संशयीत डॉक्टरचा श्रीलंका येथे इस्टरच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटा प्रकरणाशी सुद्धा संबंध असल्याचे म्हटले आहे.

डॉ. सेगू शहाबुद्दीन मोहम्मद असे या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. तर मोहम्मद हा नॅशनल तौहीद जमात या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची माहितीसुद्धा देण्यात आली आहे. इस्टरच्या दिवशी कोलंबोत साखळी बॉम्बस्फोट घडणून आणल्याने त्यामध्ये 300 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबद्दल कोणी खुलासा केला आहे त्याचे नाव गुपित ठेवण्यात आले असल्याचे रॉयटर्सच्या संपादकांनी म्हटले आहे.

(श्रीलंकेत बॉम्ब स्फोट हल्ल्यानंतर बुरखा- नकाबवर बंदी, राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांचा आदेश)

मात्र सध्या मोहम्मद याला पैशांबद्दल अफरातफर केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. परंतु नसबंदी संदर्भात या डॉक्टरने कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही. तर रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांनी त्यांच्या नकळत नसबंदी शस्रक्रिया केल्याचा आरोप लगावण्यात आला आहे. त्यामुळे श्रीलंकेत याबद्दल वादाचे वातावरण निर्माण झाले आहे.