श्रीलंकेत (Sri Lanka) ईस्टरच्या दिवशी झालेल्या बॉम्ब स्फोटनानंतर आता त्याचा अधिकाधिक तपास केला जात आहे. त्यानंतर श्रीलंकेत चेहरा झाकल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात यावी असा निर्णय राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना (Maithripala Sirisena) यांनी घेतला आहे. त्यामुळे श्रीलंकेत आता बुरखा किंवा नकाबवर बंदी घालण्यात आल्याची माहिती सिरिसेना यांनी दिली आहे.
आपत्कालीन नियमांच्या अंतर्गत,एखाद्या व्यक्तीची ओळख पटण्यासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर आजपासून हा नियम श्रीलंकेत लागू केला जाणार आहे. फेस मास्कसह अन्य चेहरा झाकल्या जाणाऱ्या गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. तर चेहरा झाकून फिरणारी एखादीसुद्धा व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी धोकादाय ठरु शकते असे आदेशात म्हटले आहे.(श्रीलंका बॉम्ब स्फोटाप्रकरणी दोघांना केरळ येथून अटक)
हल्ल्याच्या एका आठवड्याच्या नंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. तर संविधानाने दिलेल्या आणीबाणीच्या काळातील कायद्याच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या उद्देशाने बुरखा आणि नकाबवर श्रीलंकेत बंदी घालण्यात आली आहे.