अल कायदा (Al-Qaeda) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या राहिलेल्या ओसमा बिन लादेन (Osama bin Laden) याचा मुलगा हमजा बिन लादेन (Hamza bin Laden) याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. एनबीसी न्यूजने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी Hamza bin Laden याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मात्र, या अधिकाऱ्यांनी हमजा बिन लादेन याचा मृत्यू नेमका कुठे, कधी आणि कसा याबाबत माहिती दिली नाही.
न्यूयॉर्क टाईम्सने दोन अमेरिकी अधिकाऱ्यांचा हवाला देत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हमजा याला गेल्या दोन वर्षांपूर्वीच एका मोहिमेत ठार करण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र याबाबत भाष्य करण्या मनाई केली आहे. उल्लेखनीय असे की, यंदाच म्हणजे मार्च 2019 मध्ये अमेरिका सरकारने हमजा याचे अमेरिकेतील नागरिकत्व काढून घेतले होते. तसेच, त्याच्यावर 10 लाख डॉलर्सचे बक्षीसही घोषीत केले होते. Hamza bin Laden हा अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असल्याचे सांगत त्याला पकडून देणाऱ्या व्यक्तीस बक्षीस देण्याची घोषणा केली होती. (हेही वाचा, ओसामा बिन लादेनचा मुलगा हाजमा बिन लादेन वर अमेरिकेने जाहीर केला 1 मिलियन डॉलरचा इनाम)
ओसमा बिन लादेन याला तब्बल 20 मुले होती. या पैकी Hamza bin Laden हा ओसमा याच्या तिसऱ्या पत्नीचा मुलगा होता. लादेन याच्या 20 मुलांपैकी Hamza bin Laden याचा क्रमांक पंधरावा होता. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हमजा बिन लादेन याने काही दिवसांपूर्वी (मे 2011) अमेरिका आणि इतर देशांवर हल्ला करण्याची धमकी देणारे काही व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. या व्हिडिओत अमेरिकी लष्कराने आपल्या वडिलांची पाकिस्तानमध्ये केलेल्या हत्येचा बदला घेण्याचा इशारा दिला होता. त्याने सौदी अरेबियालाही धमकी दिली होती. हमजाने सौदी अरबच्या लोकांनी सउदी अरब विरुद्ध बंड करण्याची चेथावणी दिली होती.
एबटाबाद येथील ओसमा बिन लादेन याच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यांमध्ये अनेक दस्तऐवज अधिकाऱ्यांच्या हाती लागला होता. या दस्तऐवजातील माहितीवरुन पुढे आले होते की, हमजा बिन लादेन याला अल कायदा संघटनेचा उत्तराधिकारी म्हणून तयार केले जात आहे. अमेरिकी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अल कायदाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीसोबत हमजा बिन लादेन याने विवाह केल्याचा एक व्हिडिओही मिळाला होता. सांगितले जाते की, हमजा बिन लादेन याचा विवाह ईरानमध्ये झाला होता. त्याला ईरानमध्ये अटक करण्यात आली होती, असेही वृत्त होते.