कोरोना व्हायरस नसलेले देश (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगभरात मृत्यूचे तांडव सुरु असून कोरोना व्हायरस ने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यात विकसित देशांमध्ये ज्या देशाचा उल्लेख केला जातो त्या अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अमेरिकेत (USA) गेल्या 24 तासांत 1303 रुग्ण दगावले असल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे. जगभरात कोरोना बाधितांची संख्या 30,64, 837 जाऊन पोहोचली आहे. तर अमेरिकते कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 10,10,507 इतकी झाली आहे. अमेरिकेत 56,803 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेपाठोपाठ स्पेनमध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,29,422 इतकी झाली आहे. तर इटली मध्ये हिच संख्या 1,99,414 इतकी झाली आहे. ही आकडेवारी पाहता अमेरिकेतील स्थिती खूपच भयंकर तसेच चिंताजनक असल्याचे दिसत आहे. भारतात 1543 नवे COVID-19 रुग्ण, कोरोना बाधितांची एकूण संख्या 29,435

तर भारतात मागील 24 तासांत कोरोनाचे 1543 नवे रुग्ण आढळले असून 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 29, 435 वर पोहोचली असून यात 21,632 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 6868 रुग्ण बरे झाले असून 934 रुग्ण दगावले असून 1 परदेशी नागरिकांचा समावेश आहे असे ही आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.