COVID-19 (Photo Credits: IANS)

भारतात हाहाकार माजविणा-या कोरोना व्हायरसने (Coronavirus) देशाला हादरवून सोडले आहे. देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 1543 नवे रुग्ण आढळले असून 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 29, 435 वर पोहोचली असून यात 21,632 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 6868 रुग्ण बरे झाले असून 934 रुग्ण दगावले असून 1 परदेशी नागरिकांचा समावेश आहे असे ही आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील मुख्यमंत्र्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. देशातील सद्य स्थिती पाहता लॉकडाऊन बाबत काय करायचे, राज्यातील आर्थिंक स्थिती,सोयी सुविधा याबाबत सविस्तर चर्चा झाली. भारतात कोरोना व्हायरसची सुधारत असली तरी म्हणावा तसा परिणाम मिळाला नाही. महाराष्ट्रात सद्य स्थितीत Coronavirus बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर

देशात सर्वाधित कोरोना बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात सद्य स्थितीत एकूण 8590 कोरोना बाधित रुग्ण आहेत. यामध्ये सोमवारी 522 नवीन कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत व राज्यात 27 मृत्यूची नोंद झाली आहे. तर एकूण 94 रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. आजच्या आकड्यांसह एकूण मृतांचा आकडा 369 झाला आहे.

तर दुसरीकडे राज्यात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण असलेल्या मुंबई आणि ठाण्यात रुग्णांचा एकूण आकडा हा 6735 वर पोहोचला आहे. तर 238 रुग्ण दगावले आहेत.