Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: Getty Images)

संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोना व्हायरसने अमेरिकेला हादरवून सोडले आहे. मागील 24 तासांत कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 3,176 असून आतापर्यंत कोरोना व्हायरसने घेतलेल्या बळींची आकडा 50,000 इतका मोठा आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार AFP न्युज एजेंसीने हे वृत्त दिले आहे. तर वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार अमेरिकेत तब्बल 880,204 लोकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली असून तब्बल 49,845 कोरोनाग्रस्तांनी आपले प्राण गमावले आहेत.

कोरोना व्हायरसने अमेरिकेभोवती मजबूत वेढा घातला आहे. दिवसागणित मृतांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (23 एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, "जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन केम्प यांची 24 एप्रिलपासून राज्यात पुन्हा काही व्यवसाय सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्याबद्दल निराशा व्यक्त केली." (Coronavirus Pandemic दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी Immigration Ban केला लागू; पहा यामुळे अमेरिकेत कोणत्या परदेशींना फटका बसणार आणि कोणाला मिळणार सूट?)

AFP News Agency Tweet:

गव्हर्नर केम्प यांनी सोमवारी (20 एप्रिल) सांगितले की, "जॉर्जियामध्ये स्पा, टॅटू पार्लर, सलून, नृत्यनाटिका, बॉलिंग अ‍ॅलिस सुरु केले जातील. तर लवकरच सिनेमागृहे, रेस्टॉरन्ट्स खुली केली जातील. मात्र त्यासाठी सोशल डिस्टेसिंग आणि इतर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे."

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत स्थलांतरितांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. ट्रम्प यांचा हा आदेश पुढील 60 दिवसांसाठी लागू राहणार आहे. त्यामुळे Immigration Ban दरम्यान ग्रीन कार्डवर मिळणाऱ्या सुविधा रद्द केल्या आहेत.