Abdul Rehman Makki चा समावेश UNSC कडून Global Terrorist च्या यादीत
Abdul Rehman Makki | Twitter

The United Nations Security Council (UNSC) कडून सोमवार 16 जानेवारी दिवशी पाकिस्तानी दहशतवादी Abdul Rehman Makki याला जागतिक दहशतवादी (Global Terrorist) म्हणून घोषित करण्यात आले आहे. जून 2022 मध्ये, दहशतवादी अब्दुल रहमान मक्की यादीत टाकण्याचा प्रस्ताव रोखल्यानंतर भारताने चीनला फटकारले होते. पण आता UNSC 1267 Committee अंतर्गत अब्दुल रेहमान मक्कीला जागतिक दहशतवादी च्या यादीमध्ये टाकले आहे.

भारत आणि अमेरिकेने यापूर्वीच अब्दुलला त्यांच्या डोमेस्टिक लॉ नुसार, दहशतवाद्यांच्या यादीमध्ये टाकले आहे. अब्दुलचा सहभाग हा फंड गोळा करणं, विध्वंसक गोष्टींमध्ये तरूणांना सहभागी करून घेणं, भारतात प्रामुख्याने जम्मू कश्मीर मध्ये हल्य्यांचे नियोजन करणं यामध्ये होता. नक्की वाचा: 'जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित.

मक्की हा लष्कर ए तयब्बा आणि मुंबई मधील 26/11 चा हल्ला मास्टरमाईंड हफिज सईद याचा मेव्हणा आहे. त्याच्याकडे LeT मध्ये अनेक टीम्सचं नेतृत्त्व होते. 2020 मध्ये पाकिस्तानी अ‍ॅन्टी टेररिझम कोर्ट कडून त्याला दहशतवादी गोष्टींसाठी फंड गोळा केल्याप्रकरणी शिक्षा ठोठावली आहे.

चीनने यापूर्वी पाकिस्तानमधील माहित असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत अडथळे आणण्याचे प्रयत्न केले आहेत. पाकिस्तान मधील आणि UN-निषिद्ध दहशतवादी संघटना, जैश-ए-मोहम्मद (JeM) चा प्रमुख मौलाना मसूद अझहर याला नियुक्त करण्याचे प्रस्ताव त्यांनी वारंवार रोखले होते.