'जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित
Masoor Azhar (Photo Credits: File Photo)

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरच्या (Masood Azhar) बाबतीत भारताला मोठे यश प्राप्त झाले असून पाकिस्तान आणि चीनला जोरदार झटका लागला आहे. संयुक्त राष्ट्राने भारतात झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी (Global Terrorist) म्हणून घोषित केले आहे.

यापूर्वी अनेकदा संयुक्त राष्ट्रांकडून मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी होत होती. मात्र यावर चीनकडून ठोस पाऊल उचलली जात नव्हती. आता मात्र चीनने नरमाईची भूमिका घेतली आहे. (भारताला अमेरिका-ब्रिटेन-फ्रान्स यांची साथ, मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनला अल्टिमेटम)

ANI ट्विट:

आंतरराष्ट्रीय दहशतावादी म्हणून घोषित झाल्यानंतर मसूदला जगभरातील अनेक देशात प्रवेश बंदी केली जाईल. त्याचबरोबर तो जगातील कोणत्याही देशात आर्थिक व्यवहार करु शकणार नाही. तसंच संयुक्त राष्ट्राच्या सर्व सदस्यीय देशांकडून मसूदचे बँक अकाऊंट्स आणि संपत्ती फ्रीज करण्यात येईल. (जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याची संपत्ती होणार जप्त; फ्रान्स सरकारचा निर्णय)

14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी जोर धरु लागली होती.