UK Election 2024 | X

United Kingdom मध्ये आज सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदान होत आहे. या निवडणूकांनंतर सत्तांतर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. Conservative Party ची सत्ता संपवून Labour Party कडे युके ची सूत्रं जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे UK Prime Minister Rishi Sunak यांचं सरकार आता जाऊन नवं सरकार युकेची कमान सांभाळण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान ऋषी सुनक यांनी असे ठामपणे सांगितले की कंझर्व्हेटिव्ह पक्ष अजूनही "कठीण लढत" लढणार आहे तर त्यांच्या जवळच्या मित्रांपैकी एकाने पराभव मान्य केला आहे. Opinion polls च्या अंदाजानुसार, आता Labour Party सत्तेत बसण्याची शक्यता आहे. Conservative government ची मागील 14 वर्षांची सत्ता आता संपुष्टात येईल असे Reuters ने म्हटलं आहे. शुक्रवारी (5 जुलै) सकाळी मतदानाचे निकाल जाहीर होणार आहेत. ऋषी सुनक यांचा पराभव झाल्यास Labour Party चे नेते Keir Starmer पंतप्रधान होऊन 10 Downing Street ऑफिसची सूत्रं हातीघेण्याची शक्यता आहे.

Rishi Sunak यांनी बजावला मतदानाचा हक्क

UK Elections 2024 मधील खास गोष्टी

  • ब्रिटीश मतदार आज, 4 जुलै दिवशी सकाळी 7 ते रात्री 10 दरम्यान मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
  • 650 जागांसाठी हे मतदान होणार असून ओपिनियन पोल च्या अंदाजानुसार आता सत्ता लेबर पार्टीच्या हातात जाईल.
  • 5 जुलै दिवशी सकाळी लवकरच निकाल हाती येणार आहे.
  • युके मध्ये सरकार 30 मे दिवशी विसर्जित करून नव्या निवडणूक तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

युके मधील सर्वत्रिक निवडणूकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक मतं असलेल्या पक्षा नेता यंदा तो Keir Starmer आहे त्याची पंतप्रधान पदी नियुक्ती होईल. यानंतर बहुमत मिळालेल्या पक्षाचा नेता नवं सरकार स्थापन करण्यासाठी King Charles III ची भेट घेईल.

You Gov's final seat ने दिलेल्या माहितीनुसार, बहुमताचा 212 चा आकडा लेबर पार्टी मिळवू शकणार आहे. तर Conservative Party त्यांच्या इतिहासामधील सर्वात मोठा पराभव पाहणार आहे. त्यांचे लक्ष Labour governmentला प्रभावी विरोधक म्हणुन सामोरं जाण्यासाठी चांगल्या जागा मिळवणं आवश्यक आहे.