नवऱ्याचे अतिप्रेम; पण कधीच भांडण होत नाही म्हणून बायकोने मागितला घटस्फोट
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: File Photo)

विवाहित जोडप्यामधील रुसवेफुगवे आणि प्रेम या गोष्टी दोघांमध्ये नेहमी पारदर्शक राहिल्यास नाते अधिक काळ टिकते असे म्हटले जाते. मात्र नवऱ्याचे अतिप्रेम बायकोवर असणे यात काही चुकच नाही. परंतु बायको नवऱ्याच्या अतिप्रेमाला कंटाळून घटस्फोट मागते ही थोडी विचित्रच गोष्ट असली तरीही ही घटना खरी आहे. युएइ (UAE) मधील ही घटना असून नवऱ्याच्या अतिप्रेमाला कंटाळून आणि दोघांमध्ये भांडण होत नाही म्हणून चक्क बायकोने घटस्फोटाची मागणी केली आहे.

फुजैरा मधील शरिया कोर्टात याबाबत महिलेने नवऱ्याच्या विरोधात घटस्फोट देण्यात यावा म्हणून अर्ज दाखल केला आहे. मात्र विवाहित दांपत्याचे लग्न होऊन फक्त एकच वर्ष झाले आहे. खलीज टाईम्स यांनी याबाबत अधिक वृत्त दिले आहे. सदर महिलेने नवरा माझ्यावर कधीच रागवत नाही आणि ना कधी मला वाईट वाटेल असे बोलत. त्यामुळे नवऱ्याच्या या अतिप्रेमाला मी कंटाळली असल्याचे महिलेने कोर्टात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.(न्यूयॉर्कमधील एका महिलेने पकडला दोन तोंडांचा मासा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क)

नवऱ्याचा असे प्रेम पाहून माझे आयुष्य नरक बनले असल्याचे महिलेने म्हटले आहे. नवऱ्याचे माझ्यासोबत भांडण करावे अशी माझी इच्छा असून मात्र माझ्यावर प्रेमाचा अतिवर्षाव होत असल्याने मी कंटाळले असल्याचे महिलेने म्हटले आहे. परंतु नवऱ्याचे असे वागणे हे काही चुकीचे नसून त्याने एक आदर्श पती म्हणून आपले काम पार पाडत असल्याचे एका रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे.