Jaishankar

जागतिक हवामान संरक्षणाचा भाग म्हणून आयोजित IGF UAE 2022 (Global Forum) मध्ये सहभागी झालेले भारतीय परराष्ट्र मंत्री जय शंकर यांनी तडाखेबंद भाषण केले. निसर्ग संवर्धन आणि ग्लोबल वॉर्मिंगसाठी आम्ही युएईसोबत एकत्र काम करू, असे ते म्हणाले. जागतिक देश हवामान बदलाबाबत चिंता व्यक्त करत असलेल्या काही मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. विशेषतः जागतिकीकरण.. त्याचा जगातील देशांवर होणारा परिणाम स्पष्ट केला. संसाधने, सेवा आणि विकास ही कोणा एका देशापुरती मर्यादित न राहता ती जगातील सर्व देशांमध्ये समान रीतीने पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जयशंकर यांनी सांगितले की, आपल्याला केवळ परंपरा आहे असे नाही, तर त्या परंपरेत खरे तर शतकानुशतके दृढ निश्चयही आहे. जेव्हा मी इतिहास आणि आगामी काळात पुढे जाणार्‍या संबंधांकडे पाहतो, तेव्हा मी भारत-यूएई संबंधांना त्यामध्ये नक्कीच उच्च स्थान देईन असेही ते म्हणाले. UAE हा आज भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार आणि दुसऱ्या क्रमांकाची निर्यात बाजारपेठ आहे याकडे लक्ष वेधून जयशंकर म्हणाले की परदेशातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त भारतीय नागरिक UAE मध्ये राहतात हे संबंध आणखी खास बनवतात.