Twitter: भारत सरकार विरुद्ध ट्विटर पुन्हा कायदेशीर लढाईच्या तयारीत- मीडिया रिपोर्ट
Twitter Down | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) आणि भारत सरकार (Government of India) याच्यात पुन्हा एकदा कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. भारत सरकारने आपले काही आदेश मागे घ्यावेत अशी मागणी ट्विटरने केली आहे. रॉयटर या वृत्तसंस्थेने याबाबत दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचे आदेश म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याला कायदेशीर आव्हान देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. रॉयटर या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकी सोशल मीडिया कंपनीच्या प्रकरणाची न्यायालयीन समीक्षेचा हा प्रयत्न नवी दिल्लीतील आशय नियमन (content regulation) सोबतच्या संघर्षाचा एक भाग मानला जात आहे. ट्विटरने सरकारच्या आदेशांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराच या आधी भारत सरकारच्या आयटी मंत्रालयाने दिला आहे.

भारतीय अधिकाऱ्यांकडून ट्विटरला पाठिमागील एका वर्षापासून स्वतंत्र शिख राष्ट्राचे समर्थन देणाऱ्या अकाऊंट्स आणि तशाच प्रकारच्या ट्विट्सवर कारवाई करण्यााबत सांगितले होते. ज्यात कोविड-19 महामारी नियंत्रणासंदर्भात सरकारवर कठोर शब्दांत टीका करण्यात आलेल्या ट्विटचाही समावेश होता. ट्विटरच्या या कायदेशीर कारवाईबाबत भारताच्या आयटी मत्रालयाकडून अद्याप कोणतही प्रतिक्रिया आली नाही. (हेही वाचा, Twitter Stock Price Manipulation: ट्विटर गुंतवणूकदारांकडून Elon Musk यांच्या विरोधात खटला दाखल, समभागांच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप)

दरम्यान, कोरोना महामारी काळात ट्विटर आणि भारत सरकार यांच्यात एक प्रकारचा संघर्ष झाला होता. त्यानंतर भारत सरकारने ट्विटरला भारतात तक्रारनिवारण अधिकारी नेमण्याचे आदेश दिले होते. तसेच, हा अधिकारी भारतीय असावा असेही म्हटले होते. हे प्रकरण कोर्टातही गेले होते. त्यानंतर असा अधिकारी नेमण्याचे ट्विटरने मान्य केले मात्र त्यासाठी आपणास काहीसा वेळ देण्यात यावा असेही ट्विटरने म्हटले होते.