एलन मस्क (Elon Musk) हे आजघडीला जगभरात चर्चित असलेले महत्त्वाचे नाव. सोबतच ट्विटर या मायक्रोब्लॉगींग प्लॅटफॉर्मचे सीईओ (Twitter CEO) आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी त्यांची ओळख. पण आता जगातील पहिल्या क्रमांकाची सर्वात श्रीमत व्यक्ती अशी एलन मस्क यांची ओळख राहिली नाही. ती जागा बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) यांनी घेतली आहे. एलन मस्क यांच्या संपत्तीत घट झाल्याने त्यांना जभरातील पहिल्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती हे स्थान गमवावे लागले आहे.
इलॉन मस्क यांच्याकडे एकेकाळी 340 अब्ज डॉलर्स एवढी किंमत होती. पण आता त्याहीपेक्षा अधिक संपत्ती ही बर्नार्ड अरनॉल्ट यांच्याकडे आहे. सहाजिक बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
ब्लूमबर्गने जगातील सर्वात श्रीमंत लोकांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार, 51 वर्षीय एलोन मस्क यांची संपत्ती जानेवारीपासून 100 अब्ज डॉलर्सने कमी होऊन ती 168.5 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये सकाळी 10:20 पर्यंत एलोन मस्क यांची संपत्ती 73 वर्षीय बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या 172.9 अब्ज डॉलर्स निव्वळ संपत्तीपेक्षा कमी आहे. बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर फॅशन दिग्गज LVMH च्या 48% मालकीतून प्राप्त होते. (हेही वाचा, Twitter पोस्ट शब्दमर्यादा आता 280 नव्हे 4,000 होणार, सीईओ Elon Musk यांची माहिती)
दरम्यान, रँकिंगच्या वरच्या स्थानावरून मस्कची घसरण झाली आहे. सप्टेंबर 2021 पासून मस्क हे नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत. मात्र, सप्टेंबरपासून ते दुसऱ्या स्थानावर जाणे पहिल्यांदाच घडते आहे. मस्क यांनी एप्रिलमध्ये 44 बिलियन डॉलर्स मध्ये Twitter मालकी घेण्याची ऑफर देऊन जगाला धक्का दिला होता.