तुर्कीमधील सर्वात मोठे शहर इस्तंबूलमधील एका नाईट क्लबला (Istanbul Night Club) मोठी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी नुतनीकरणाचे काम सुरू असताना लागलेल्या आगीत कमीत कमी 29 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक जण गंभाररित्या जखमी देखील झाले आहेत. याप्रकरणी क्लबच्या व्यवस्थापकासह पाच लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. (हेही वाचा - Taiwan Earthquake: तैवानमध्ये 7.2 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप, जपानमध्ये त्सनामीचा इशारा)
पाहा पोस्ट -
Fatal blaze engulfs Istanbul nightclub during renovation; dozens killed
Read @ANI Story | https://t.co/3uiR9Kttzm#Istanbul #Fire #Turkey pic.twitter.com/Mzky3DAwPx
— ANI Digital (@ani_digital) April 3, 2024
स्थानीक राज्यपाल कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, रुग्णालयात फक्त एका व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. मस्करेड नाईट क्लब अनेक दिवस बंद होता. इमारतीत रिनोव्हेशनचे काम सुरू होते. हा नाईट क्लब 16 मजली इमारतीच्या बेसमेंटमध्ये होता. गवर्नरने सांगितले की, आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. आगीत ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी अधिकांश रेनोव्हेशन कामातील मजूर होते.
पाहा पोस्ट -
İstanbul’un Beşiktaş İlçesi Gayrettepe Mahallesindeki bir işletmede çıkan yangında hayatını kaybedenlere Allah’tan rahmet, yaralılara acil şifalar diliyorum.
Çıkan yangınla ilgili İstanbul Cumhuriyet Başsavcılığı tarafından adli soruşturma başlatılmış olup, 3 Cumhuriyet savcısı…
— Yılmaz TUNÇ (@yilmaztunc) April 2, 2024
तुर्कीचे न्यायमंत्री यिलमाझ टुनाक म्हणाले आहेत की, इस्तंबूलच्या बेसिकटास जिल्ह्यातील गेरेटेपे जिल्ह्यात लागलेल्या आगीत प्राण गमावलेल्यांवर माजी श्रद्धांजली. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी मी पार्थना करत आहे. आगीप्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तीन सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर इकरेम इमामोगलू यांनी सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण इमारतीची पाहणी केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन व वैद्यकीय पथके दाखल झाली आहेत.