तैवानमध्ये सुमारे 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. त्यानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला. तैवान सरकारने याबाबतची माहिती जाहीर केली, बुधवारी पहाटे तैवानची राजधानी तैपेईमध्ये हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानच्या हुआलियन शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले आहे. तैवानमधील भूकंपानंतर जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. ओकिनावा प्रांताच्या आसपासच्या किनारी भागासाठी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या सुनामी लाटा तीन मीटरपर्यंत उंच असू शकतात.

पाहा व्हिडिओ -

सोशल मीडियातून समोर आलेल्या व्हिडीओनुसार, भूकंपानंकर अनेक इमारती कोसळल्या आहेत. पूल आणि रस्त्यांवरील वाहने हालताना दिसले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे समोर आले आहे. या भूकंपाची तिव्रता पाहता मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.

पाहा व्हिडिओ -

भूकंपामुळे अनेक शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक लोक इमारतींमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान या भूकंपामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर देशभरातील रेल्वे सेवा आणि इंटरनेट सेवा बंद झाली आहे. या भूकंपाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे