Turkey and Syria Earthquake | (Photo Credit - Twitter/ANI)

सीरिया (Syria Earthquake), तुर्कस्तान (Turkey Earthquake) या देशांमध्ये सोमवारीची (6 फेब्रुवारी) पहाट अनेकांच्या आयुष्यात अंधार घेऊन आली. या दोन्ही देशांमध्ये तीव्र भूकंप झाला. भूकंपमान यंत्रावर या भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल इतकी नोंली गेली आहे. भूकंपात आतापर्यंत 1300 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या अजूनही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूकंपामुळे सर्वाधिक हानी ही दक्षीण तुर्कीमध्ये झाली. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन (Recep Tayyip Erdogan) यांनी ट्विटरवर सांगितले की, भूकंपाचा फटका बसलेल्या भागात शोध आणि बचाव पथके तात्काळ पाठवण्यात आली आहेत.

वृत्तसंस्था एएनआयने अमेरिकन ब्रॉडकास्टरने देशाचे उपाध्यक्ष फुआत ओकटे यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ताचा या आधी म्हटले होते की,  7.8 रिष्टर स्केलच्या भूकंपात तुर्कीमध्ये किमान 284 लोक ठार झाले आहेत आणि सुमारे 2,300 लोक जखमी झाले आहेत. मात्र हा आकडा आता सातत्याने वाढतो आहे.  दरम्यान, 10 तुर्की शहरांमध्ये 1,700 हून अधिक इमारतींचे नुकसान झाल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा - Turkey Earthquake: तुर्कस्तानमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप; अनेक इमारती कोसळल्या)

ट्विट

तुर्कीसोबतच सीरियामध्येही किमान 237 लोक मारले गेले आणि 639 जखमी झाले. सीरियाची सरकारी वृत्तसंस्था SANA ला दिलेल्या प्रतिक्रियेत आरोग्य मंत्रालयाने पाठिमागील शंभर वर्षातील सर्वात मोठ्या भूकंपापैकी एक असे या भूकंपाचे वर्णन केले आहे. भूकंपामुले संपूर्ण परिसरात कंपने निर्माण झाली. इमारती कोसळल्या. ज्यामुळे लोक प्रचंड घाबरले. जीवच्या अकांताने सैरावैरा धावू लागले. जीव वाचविण्यसाठी घरातून बाहेर पडत असताना मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली.

ट्विट

दरम्यान, तुर्कस्तानमध्ये झालेल्या भीषण भूकंपात अनेकांचा बळी गेल्यानंतर जगभरातून शोक व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून तुर्कस्तान आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या भीषण भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल आणि 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याबद्दल शोक व्यक्त केला. शिवाय, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनीही ट्विट करून तुर्की आणि सीरिया या दोन्ही देशांना हादरवून सोडणाऱ्या भीषण भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले.